घरमहाराष्ट्रअभिजीत बिचुकलेंची कळंबा कारागृहात रवानगी

अभिजीत बिचुकलेंची कळंबा कारागृहात रवानगी

Subscribe

बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वातील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांना खंडणी प्रकरणी कारागृहात टाकण्यात आले आहे.

बिग बॉसच्या दुसर्‍या पर्वातून सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अभिजित बिचुकले याला चेक बाऊन्स प्रकरणात अटक केल्यानंतर चार दिवसानंतरही त्याला जामीन मिळालेला नाही. सिव्हिलच्या प्रिझन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या बिचुकले याची काल, सोमवारी दुपारी उशिरा कोल्हापूर येथील कळंबा जेलमध्ये रवानगी करण्यात आली. दरम्यान, खंडणीच्या एका प्रकरणात जामीन फेटाळल्याने त्याला जेलमध्ये जावे लागले आहे.

खंडणी प्रकरणी झाली शिक्षा 

मराठी बिग बॉसमध्ये अभिजित बिचुकले याची वर्णी लागल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे त्याने लक्ष वेधून घेतले. मात्र कायदेशीर प्रक्रियेमध्ये त्याच्यावर अजामीनपात्र वॉरंट निघाले आणि सातारा पोलिसांनी त्याला मुंबईतून उचलले. शुक्रवारी त्याला अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले. चेक बाऊन्सप्रकरणात जामीन मंजूर झाला. मात्र पोलिसांनी जुन्या खंडणीच्या प्रकरणात लगेचच अटक केल्यानंतर न्यायाधिशांनी त्याचा जामीन अर्ज फेटाळला. सोमवारी जामिनासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर सुनावणी झाली नाही. दरम्यानच्या काळात अभिजित बिचुकले प्रकृती अस्वस्थेमुळे सिव्हीलच्या प्रिझन वॉर्डमध्ये अ‍ॅडमिट होता. सोमवारी प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली.

- Advertisement -

काय आहे प्रकरण

बिग बॉसच्या घरातील सर्वात गाजलेला स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी चेक बाउन्सप्रकरणी अटक केली होती. परंतु, ही अटक म्हणजे माझ्याविरोधात रचल्या जाणाऱ्या कट-कारस्थानाचा भाग आहेत असा आरोप अभिजीत बिचुकलेनं केला. अभिजीत बिचकुलेला गोरेगाव फिल्मसिटीतील ‘बिग बॉस’च्या घरात जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. साताऱ्यातील कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करण्यात आला. परंतु, त्याआधी छातीत दुखल्याचे कारण सांगून अभिजीत बिचुकले याला उपाचारांसाठी रुग्णालयात दाखल होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -