घरमहाराष्ट्रखडसे-पंकजांविरोधी कारवाईसाठी फडणवीस गटाच्या जोरदार हालचाली

खडसे-पंकजांविरोधी कारवाईसाठी फडणवीस गटाच्या जोरदार हालचाली

Subscribe

भाजप नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देण्याच्या घेतलेल्या भूमिकेनंतर कधी नव्हे तो स्वत:चा गट निर्माण करण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं आहे. या गटाचे प्रमुख म्हणून सध्या जळगावचे भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी आहे. कुठल्याही परिस्थितीत पक्षात खडसे आणि मुंडे या दोन नेत्यांना स्थान असता नये, अशा तयारीने हा गट कामाला लागला आहे. विशेष म्हणजे खडसे यांच्या विरोधात थेट कारवाईची मागणी करत मुंडे यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्याची जोरदार मागणी या गटाने लावून धरली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशिवाय केंद्रिय नेतृत्वाकडेही या गटाने तक्रारी केल्याची माहिती हाती आली आहे.

भारतीय जनता पक्षात नो व्हेअर केलेल्या एकनाथ खडसे यांना राजकीय पटलावरून दूर करण्याचा चंग पक्षात देवेंद्र फडणवीस यांनी मांडला होता. फडणवीस यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ मंत्री म्हणून कार्यरत असताना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून खडसे यांना दूर करण्यात आलं. चौकशीनंतर ते पुन्हा मंत्रिमंडळात येतील, असं फडणवीस सांगत होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसे यांनी क्लिनचिट देऊनही फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं नाही. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतून बहुजन नेत्यांना दूर ठेवण्यात आलं. यात खडसे यांचा समावेश होता. खडसे यांना उमेदवारी देण्यात आली नाहीच, त्यांच्या कन्या रोहिनी यांना उमेदवारी देऊनही त्यांचा पराभव झाला. हा पराभव पध्दतशीर घडवून आणण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. यासंबंधी त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारीही केल्याचं सांगितलं.

- Advertisement -

नेतृत्वाला आव्हान देणार्‍या दुसर्‍या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा परळीत झालेला पराभव मुंडे यांच्या चांगलाच वर्मी लागला असून, हा पराभव जाणीवपूर्वक घडवण्यात आल्याची तक्रार त्यांनीही पक्षाकडे केली. या दोन्ही तक्रारींची नेतृत्वाने दखल न घेतल्याची सल या दोन्ही नेत्यांनी परळीत आयोजित मेळाव्यात उघड केली. या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी नेतृत्वावर जोरदार टीका केली आणि आपण पक्षात असूच असं नाही, असं सूचक वक्तव्य केलं. तर मुंडे यांनी स्वत:ला पक्षाच्या कोअर कमिटीतून काढावं, अशी सूचना केली.

परळीतील या मेळाव्याने भाजपची पुरती कोंडी झाली. या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नावं घेऊन टीका करण्यात आली. या दोन नेत्यांच्या आव्हानाच्या भूमिकेने फडणवीस बॅकफुटवर आल्याचं पाहायला मिळालं. हे लक्षात घेत पक्षात फडणवीस गट निर्माण करत खडसे आणि मुंडे यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडण्यात आली आहे. या गटाची जबाबदारी जळगावचे माजी मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. गटाने खडसे यांच्या विरोधात कडक कारवाईबरोबरच मुंडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. खडसे यांना पक्षातून दूर करण्यासाठी या गटाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -