घरमहाराष्ट्रआरोपीवर कारवाई न केल्यामुळे दोन पोलीसांवर कारवाई

आरोपीवर कारवाई न केल्यामुळे दोन पोलीसांवर कारवाई

Subscribe

धावत्या एस टी बस मध्ये हत्या प्रकरण व मुलीचे आश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल प्रकरणात आरोपीवर कारवाई न केल्यामुळे दोन पोलीसांवर कारवाई चे संकट ओढावले आहे.

धावत्या एस टी बस मध्ये हत्या प्रकरण व मुलीचे आश्लिल फोटो सोशल मिडियावर व्हायरल प्रकरणात आरोपीवर कारवाई न केल्यामुळे दोन पोलीसांवर कारवाई चे संकट ओढावले आहे. कर्तव्यामध्ये निष्काळजीपणाचा ठपका ठेवून खेड पोलीस ठाण्यामधील दोन पोलिसांचे अखेर निलंबन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी राम पठारे यांनी दिली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात कार्यरत दावडी बीट पोलीस नाईक डी. वाय. सावंत, ए. डी. उबाळे या दोघांना निलंबित केले आहे. दावडी येथील आरोपी अजित कान्हुरकर हा एका पीडित मुलीला त्रास देत होता. तिचे फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर व फेसबुकवर पोस्ट करणे यामुळे खेसे कुटुंब त्रस्त झाले होते. याबाबत खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, या प्रकरणाकडे या पोलिसांनी दुर्लक्ष करून आरोपीकडून कारवाई न करण्यासाठी आर्थिक व्यवहार केला होता. असा आरोप नातेवाईकांनी केला होता.

पोलिसांनी कारवाई न केल्याने आरोपी मोकाट 

दरम्यान पीडित मुलीचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून या मुलीची व कुटुंबांची बदनामी करत होता. खेड पोलीस ठाण्यात आरोपी अजित यांच्याविरुद्ध (८ जून) रोजी पिडित मुलीने फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता. आरोपी हा आमच्या मुलीला वारंवार त्रास देतो. त्याला अटक करा, समज द्या, अशी मागणी खेसे कुटुंबियाने पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने आरोपी मोकाट फिरत होता.

- Advertisement -

एस टी बस मधील हत्या प्रकरण

१२ जूनला सकाळी साडेसातला पीडित मुलीचा भाऊ श्रीनाथ सुदाम खेसे यांच्यावर चालत्या एसटी बसमध्ये कोयत्याने वार करून निघृण हत्या केली. श्रीनाथ यांच्या नातेवाईकांनी व दावडी गावातील ग्रामस्थांचा खेड पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी आरोपीला लवकर पकडले असते तर श्रीनाथचा जीव गेला नसता, त्या पोलिसांना तत्काळ निलंबित करा, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त झालेल्या नातेवाईक व ग्रामस्थांनी घेतली होती. सुमारे तीन तास श्रीनाथ यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच होता. आरोपीला न पकडता आरोपीकडून या पोलिसांनी पैसे घेऊन मोकाट सोडले, त्यांना तातडीने निलंबित करा, अशा घोषणा स्टेशनसमोर देण्यात आल्या होत्या. दरम्यान, अप्पर पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते यांनी खेड पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाबाबत पोलीस कर्मचारी दोषी आढळले तर त्यांना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन संतप्त नातेवाईक व ग्रामस्थांना दिले होते.

दोन पोलीसांवर ठपका

पोलीस कर्तव्यावर असताना, त्यांनी निष्काळजीपणा केला, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. सदर प्रकरणाची चौकशी खेड उपविभागीय पोलीस अधिकारी राम पठारे यांनी पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्याकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावरून दोन जणांचे निलंबन केले असुन दोन्ही पोलीसांनी हेड कॉर्टरला रोजची हजेरी द्यायची आहे.

- Advertisement -

-रोहिदास गाडगे
राजगुरुनगर-पुणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -