घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरखोके गॅंग महाराष्ट्रद्वेषी; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

खोके गॅंग महाराष्ट्रद्वेषी; आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा

Subscribe

औरंगाबादः खोके गॅंग ही महाराष्ट्रद्वेषी आहे. टक्केवारीत अडकली आहे, अशा शब्दांत आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर गुरुवारी निशाणा साधला.

आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरु आहे. ते गुरुवारी पैठण येथे होते. तेथे आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडावर भाष्य करताना शिंदे गटावर टीका केली. ते म्हणाले, आमचा संविधानावर पूर्ण विश्वास आहे. निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने लागणार आहे. शिवसेनेतून फुटलेले ४० गद्दार आमदार राजकारणातून हद्दपार होणार आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी नुकसानभरपाई पासून वंचित आहे. मात्र खोके गॅंगचा गट टक्केवारीत अडकला आहे. नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहे. तर दुसरीकडे एका शेतकऱ्याच्या शेतात हेलिपड उतरते. हा श्रीमंत शेतकरी म्हणजे मंत्रालयात बसणारे मुख्यमंत्री, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

विरोधकांनी ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. ओला दुष्काळ जाहिर करा नाही तर खुर्ची खाली करा, असे सांगूनही सत्ताधारी खुर्चीला चिकटून आहेत. ओला दुष्काळ जाहिर करत नाहीत. दुसरीकडे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढत आहे. राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. गद्दार आमदार सुरतमध्ये लपून बसले होते. त्या उपकाराची परतफेड म्हणून महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला देण्यात आले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा डाव रंगतोय. आदित्य ठाकरेंनी अलीकडेचं मुख्यमंत्र्यांच्या वरळीतील सभेनिमित्त त्यांना एक आव्हान दिलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देत वरळीतून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, वरळीतून नाही तर मी ठाण्यात त्यांनी उभं राहावं मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवतो, असं खुलं आव्हान दिलं होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी ही आव्हानं झुगारून लावली. त्यानंतरही आदित्य ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक सुरुच असते. गुरुवारी आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -