घरताज्या घडामोडीउत्थान : शिकणे गमतीदार बनविण्यासाठी अभिनव कार्यक्रम

उत्थान : शिकणे गमतीदार बनविण्यासाठी अभिनव कार्यक्रम

Subscribe

मुंबई: कोविड-१९ महासाथीच्या काळात निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे राहून गेलेले शिक्षणातील अंतर भरून काढण्यासाठी आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीला रोखून, त्यांचे शाळेला येण्याचे सातत्य टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या वर्षाच्या सुरुवातीला, अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) अदाणी फाऊंडेशनच्या सोबतीने ‘उत्थान’ हा कार्यक्रम हाती घेतला.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, अदाणी फाऊंडेशनने बृहन्मुंबई महानगरपालिकाद्वारे पालिकेच्या पी-उत्तर आणि एम- पश्चिम या प्रभागांमध्ये चालविल्या जाणार्‍या ३१ शाळा निर्धारीत केल्या, जिथे मुलांना संख्या आणि साक्षरतेतील दरी भरून काढणारी उजळणी करणारी कौशल्ये शिकवली गेली. फाऊंडेशनकडून हा उपक्रम तिचे स्वयंसेवक आणि पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या संघाला सोबत घेऊन राबविला जातो. यातून शिक्षकांना शिकवण्याच्या नवनवीन तंत्राचे प्रशिक्षण दिले जाते. हा कार्यक्रम लवकरच उपनगरातील ६० पालिका शाळांमध्ये विस्तारला जाणार आहे.

- Advertisement -

या वर्षी ‘उत्थान’ कार्यक्रमातून मुलांनी शिकलेल्या कौशल्याची चाचणी घेण्यासाठी ‘जल्लोष २०२२’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ३१ शाळांमधील मुलांनी वक्तृत्व, कथाकथन, एकांकिका, चित्रकला, गायन आणि टाकाऊ गोष्टींपासून टिकाऊ वस्तू तयार करणे अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. मंगळवारी एमसीजीएम आणि अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते या स्पर्धांमधील विजेते आणि उत्थान सहाय्यकांचा सत्कार करण्यात आला.

अदाणी इलेक्ट्रिसिटीचे प्रवक्ते या प्रसंगी म्हणाले, “आम्ही अनेकदा देशाची तरुण लोकसंख्या आणि लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाबद्दल बोलतो, परंतु हा लाभांश मिळविण्यासाठी, आपले मनुष्यबळ भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुरेसे कुशल असणे आवश्यक आहे आणि ‘उत्थान’सारख्या कार्यक्रमांद्वारे आमचे मानवी संसाधन भविष्यासाठी तयार करण्याचे आमचे ध्येय आहे.”

- Advertisement -

अदाणी फाऊंडेशनचे प्रवक्ते म्हणाले, “अदाणी फाऊंडेशन आरोग्य सेवा, शाश्वत उपजीविका आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये हस्तक्षेप करून सहकारी भारतीयांचे जीवन चांगले बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि ‘उत्थान’ हा असाच एक उपक्रम आहे. जिथे आम्ही शिकण्यातील दरीला भरून काढण्याचा आणि वंचित समाजघटकांतून आलेल्या विद्यार्थ्यांना आजच्या अत्यंत स्पर्धात्मक जगासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न करत असतो.”

अदाणी फाऊंडेशन‘उत्थान’ व्यतिरिक्त झोपडपट्टीतील महिलांसाठी ‘स्वाभिमान’ कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत, महिलांचे स्वयं-सहायता गट तयार केले जातात, त्यांना पैसे कसे वाचवायचे आणि त्यांच्या बचतीतून उभे राहिलेले भांडवल लहान व्यवसायांसाठी कसे वापरायचे हे शिकवले जाते. महिलांना साफसफाईची उपकरणे, मेणबत्त्या, मसाले, इमिटेशन ज्वेलरी आणि बरेच काही तयार करण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण देखील मिळते.

अदाणी फाउंडेशन बद्दल :

१९९६ मध्ये स्थापित अदानी फाऊंडेशनचे विविध १८ राज्यांमध्ये व्यापक परिचलन आहे. यामध्ये देशभरातील २,४१० गाव आणि शहरे समाविष्ट आहेत. त्या प्रत्येकात व्यावसायिकांची एक चमू कार्यरत आहे. ती नाविन्य, समाजाचा सहभाग आणि सहयोग यांचा समावेश असलेल्या दृष्टिकोनासह कार्यरत आहे. ३६.७० लाख जनतेच्या जीवनाला आकार देत तसेच सामाजिक भांडवल निर्मितीच्या दिशेने उत्कटतेने संस्था कार्य करत आहे. शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास आणि पायाभूत सुविधा विकास या चार प्रमुख क्षेत्रावर भर देत अदानी फाऊंडेशन ही ग्रामीण आणि शहरी समुदायाच्या सर्वसमावेशक वृद्धी आणि त्यांच्या शाश्वत विकासासाठी कार्य करत अप्रत्यक्षरित्या राष्ट्रउभारणीत योगदान देत आहे.

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडबद्दल :

अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) ही वैविध्यपूर्ण अशा अदानी समूहाची एक महत्त्वाची उपकंपनी आहे. कंपनी वीज निर्मिती, पारेषण आणि किरकोळ वीज वितरणाच्या एकात्मिक व्यवसायात कार्यरत आहे. AEMLच्या अखत्यारित भारतातील सर्वात मोठे आणि सर्वात कार्यक्षम अशा वीज वितरणाचे जाळे असून त्याचे परिचलनही कंपनीमार्फत होते. AEML ही ४०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या ३० लाखांहून अधिक ग्राहकांना विविध सेवा देते. मुंबई आणि उपनगरात ९९.००% विश्वासार्हतेसह जवळपास २,००० मेगावॅटची वीज मागणी पूर्ण केली जाते. ही मागणी देशातील सर्वाधिक आहे. AEML कंपनी प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उत्कृष्ट ग्राहक सेवा देऊ करते.


हेही वाचा : भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -