घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Subscribe

"मी पुन्हा येईन म्हंटल की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहीत आहे." असे फडणवीसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये एका भाषणात वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या चर्चा करण्यात येत आहेत.

शरद पवार यांच्या निर्णयानंतर सध्या राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण हे सध्या पवार यांच्या अवतीभवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “मी पुन्हा येईन म्हंटल की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहीत आहे.” असे फडणवीसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये एका भाषणात वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या या वक्तव्यावर वेगवेगळ्या चर्चा करण्यात येत आहेत.

राज्यात महिन्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारबाबत विविध चर्चा करण्यात येत आहेत. अजित पवार हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा करण्यात येत होत्या. तर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चा करण्यात येत होत्या. पण शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर सर्व चर्चा मागे पडल्या. पण आता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा या चर्चा सुरू झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या बारसूमधील सभेला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांची सरकारवर टीका

बेळगावात प्रचारासाठी गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. त्यानंतर तेथील प्रचार सभा आटोपून देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी चंदगडमध्ये (Chandgad)भाषण केले. या भाषणामध्ये ते म्हणाले की, मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह. त्यामुळे आपण कुठूनही प्रगती करतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंदगडमधील निट्टूर गावातील सभेत हे वक्तव्य केले आहे. सीमाभागात दौऱ्यावर असलेल्या फडणवीस यांनी नरसिंह मंदिराला अचानक भेट दिली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून चंदगड तालुक्यातील निट्टूर (ता.चंदगड) येथील प्रसिद्ध नृसिंह मंदिरास भेट देण्यासाठी या, असा आग्रह केला. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसंच निट्टूर येथील नृसिंह मंदिर परिसराच्या विकासासाठी लवकरच आराखडा तयार करुन निधी उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा देखील केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी शिवाजीराव पाटील यांच्या कामाचे कौतुक करत तसेच चंदगडला पुन्हा एकदा येणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -