घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या बारसूमधील सभेला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांची सरकारवर टीका

उद्धव ठाकरेंच्या बारसूमधील सभेला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांची सरकारवर टीका

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या शनिवारी (ता. 06 मे) बारसू गावाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने ते गावकऱ्यांशी संवाद साधून सभा घेणार होते. पण त्यांच्या या सभेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

कोकणातील नाणार येथे उभा करण्यात येणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला नाणार वासीयांचा विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव येथे उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण मागील आठवड्यात या गावातील नागरिकांनी हा प्रकल्प या ठिकाणी उभारण्यात येऊ नये, यासाठी जोरदार आंदोलन केले. पण या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या प्रकरणाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे.

हेही वाचा – उत्तराखंडात जोशीमठजवळ दरड कोसळली; बद्रीनाथ यात्रा थांबवली

- Advertisement -

याच प्रकरणी चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे बारसू आंदोलकांची शनिवारी (ता. 06 मे) भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी बारसूला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची भेट घ्यावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सभेला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यत आलेली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबत आता ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. पण अद्यापही याबाबत उद्धव ठाकरे यांनी कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.

याबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही लोकशाही त्यामुळे विरोध करणाऱ्यांना परवानगी नाही आणि त्यामुळे परप्रांतीयांची दलाली करणाऱ्या मोर्चे काढणाऱ्यांना परवानगी देण्यात आलेली आहे. ही एक नवीन लोकशाही या महाराष्ट्रात आणि देशात सुरू झालेली आहे, असे म्हणत राऊतांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी बारसूमधील दौरा जाहीर केल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी सुद्धा बारसू रिफायनरीच्या समर्थनात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. सत्ताधाऱ्यांच्या या मोर्च्यामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते प्रमोद जठार हे रिफायनरीच्या समर्थनात निघाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता हे विरोधक आणि सत्ताधारी समोरासमोर आल्यानंतर नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -