घरताज्या घडामोडीCorona: रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

Corona: रायगड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन

Subscribe

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होणार असून २४ जुलैपर्यंत असणार आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

आज सर्वपक्षीय आमदारांची बैठक जिल्हाधिकारी कार्यलयात पार पडली. या बैठकीत पुन्हा संपूर्ण रायगड जिल्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा लॉकडाऊन १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २४ जुलै पर्यंत असणार आहे. एकूण १० दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे.

- Advertisement -

गेल्या १० ते १२ दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यात तीन ते साडे तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढत आहे. काल रायगड जिल्ह्यात ४३२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ७ हजार ७६३वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार २६० कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत ४ हजार २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याती कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्या दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – Corona: आज औरंगाबाद जिल्ह्यात ११३ कोरोनाबाधितांची वाढ!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -