घरताज्या घडामोडीआमदार निधीतून ३५० कोटी कोरोनावर खर्च करता येणार, अजित पवारांनी पूर्ण केली...

आमदार निधीतून ३५० कोटी कोरोनावर खर्च करता येणार, अजित पवारांनी पूर्ण केली चंद्रकांत पाटलांची मागणी

Subscribe

डॉक्टरांनी सहकार्य करावे अन्यथा कडक कारवाई करावी लागेल

पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याचे विभागीय आयुक्त, आमदार, खासदार जिल्हाधिकारी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील कोरोना परिस्थिती आणि पुढच्या आठवड्यातील कोरोना परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच पुण्यात अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शन, तसेच कोरोनावर खर्च करण्यासाठी आमादार निधीत असलेल्याला ४ कोटींपैकी १ कोटी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे ३५० कोटी खर्च करता येणार आहेत. तसेच ऑक्सिजन वाढवण्यावर, व्हेंटिलेटर वाढवण्यावर चर्चा झाली.

पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, पुण्यातील कोरोना परिस्थितीवर जवळ जवळ तीन तास चर्चा केली. देशात अनेक राज्यांत कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तिच गोष्ट महाराष्ट्रात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही कडक निर्णय घेतले आहेत. तसेच मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील धोरणाबाबत ठरवले जाईल. तसेच जर पुढच्या काळात पेशंट वाढण्याचे गृहित धरुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू बेड आणि साधारण बेड वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. खासगी रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयांत बेड वाढवण्यात येत आहेत.

- Advertisement -

रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा राज्यात निर्माण झाला होता यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. यामध्ये ३५०० इंजेक्शन उपलब्ध झाले त्यातील २ हजार इंजेक्शन पुण्यासाठी देण्यात आले. तसेच ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध करण्यासाठी रायगडच्या जिंदाल ग्रुपसोबत बैठक घेण्यात आली यामध्ये जिंदाल ग्रुपतर्फे काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करणार असल्याचे आश्वासन जिंदाल यांनी दिले आहे. तसेच मुकेश अंबानीसोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा करण्यास सांगितले आहे. मुकेश अंबानी देखील ऑक्सिजन देणार आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महाराष्ट्राला व्हेंटिलेट देण्याची घोषणा केली होती. यानंतर काही व्हेंटिलेटर मिळाले आहेत परंतु अजून काही बाकी आहेत त्याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना संपर्क करण्यास सांगितले आहेत. तसेच मी स्वतः त्यांना फोन करुन विचारणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

३५० कोटी कोरोनावर खर्च करता येणार

राज्यातील आमदार निधीत ४ कोटी आहेत त्यातील १ कोटी कोरोनावर खर्च करण्यात येणार आहे. भाजपची मागणी होती ती मान्य करण्यात आली आहे. राज्यात विधानसभेचे २८८ आमदार आहेत. आणि काही आमदार विधानपरिषदेचे आहेत. असे एकूण ३५० आमदार आहेत त्यामुळे ३५० कोटी रुपये करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.

डॉक्टरांनी सहकार्य करावे अन्यथा कडक कारवाई करावी लागेल

ससून रुग्णालयात मागच्यावेळेपेक्षा अधिक बेड वाढवण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांवर डॉक्टर उपचार करतात परंतु जेव्हा रुग्ण खालावतो तेव्हा ससूनमध्ये पाठवण्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टरांना विनंती देशासह जगात कोरोना परिस्थिती उद्भवलेली आहे. आपण वैद्यकीय क्षेत्र स्वतः शिक्षणासाठी निवडलेले आहे. आपण संपूर्ण रुग्णालय नेहमीसाठी कोरोना रुग्णालय म्हणून केलेल नाही. त्या संदर्भात बैठक लावली आहे. त्यांच्या रास्त बाबी असतील तर सरकार म्हणून मान्य करुन पण टोकाची भूमिका घेतली तर सरकारला काहीतरी निर्णय घेण्याची गरज लागेल. साळुंखे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना मान्य कराव्यात, तसेच मी माध्यमांद्वारे त्यांना विनंती करतो की, टोकाची भूमिका घेऊ नका आपला सर्वांचा महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्रातील हे नागरिक आहेत. अडचणीच्या काळात त्यांनी सहकार्याची भूमिका त्यांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -