घरमहाराष्ट्रअजित दादांकडून विजय शिवतारे पुन्हा चेकमेट; नीरा कृषी उत्पन्न समिती निर्विवाद

अजित दादांकडून विजय शिवतारे पुन्हा चेकमेट; नीरा कृषी उत्पन्न समिती निर्विवाद

Subscribe

पुणेः नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर निर्विवाद विजय मिळवत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पुन्हा चेकमेट केले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीने १८- ९ असा विजय मिळवत शिवतारे यांच्या नेतृत्त्वातील युतीला पराभूत केले आहे.

अजित पवार हे नेहमीच शिवतारे यांना निवडणुकीत आव्हान देत असतात. या निवडणुकीतही अजित पवार यांनी शिवतारे यांना पराभूत केल्याची चर्चा अधिक रंगली.

- Advertisement -

या निवडणुकीत युतीला एकही जागा मिळाली नाही. महाविकास आघाडीने दोन जागांवर बिनविरोध विजय मिळवला तर अटीतटीच्या लढतीत १६ जागांवर युतीला पराभूत केले. मात्र ग्रामपंचायत लढतीत युतीने महाविकास आघाडीला चांगलीच टक्कर दिली.

अजित पवार, आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने सुरुवातीलाच व्यापारी मतदारसंघातील दोन जागा बिनविरोध पटकावल्या. उर्वरित १६ जागांवार विजय शिवतारे, भाजप नेते जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप, आरपीआय, शेतकरी संघटना यांच्या महायुतीला निरा समितीत खाते उघडता आले नाही.  मविआने ९८७ ते १३०० अशा फरकाने युतीला पराभूत केले. तोलारीची जागाही ४७ च्या फरकाने मिळविली. गेल्या निवडणुकीत शिवतारे गटाची अमानत रक्कम जप्त झाली होती. त्याची पुनरावृत्ती या निवडणुकीत झाली नाही.

- Advertisement -

ग्रामपंचायत मतदारसंघात शिवतारेंच्या नेतृत्त्वातील महायुतीने बाजी मारली. मविआने ६४ ते ११७ अशा फरकाने विजय प्राप्त केला. पवारांच्या बारामती या बालेकिल्ल्यात शिवतारे यांनी दिलेली ही लढत लक्षवेधी ठरली आहे. त्यांना सासवड, जेजुरी, नायगाव, परिंचेमध्ये चांगली मते मिळाली.

राज्यभरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election 2023) निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण १५ पैकी ११ जागांवर भाजप-शिंदे गटाला विजय मिळाला आहे. तर ४ जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळविण्यात यश आले आहे. महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे.छत्रपती संभाजीनगरच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

राज्यात १४७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यापैकी ९५ बाजार समित्यांची आज मतमोजणी सुरू आहे. तर ३४ बाजार समित्यांची शुक्रवारी मतमोजणी झाली आहे. या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस यांच्या महायुतीला भुईसपाट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -