घरमहाराष्ट्रअजित पवारांनी भेटण्यासाठी फोन केला होता - संभाजीराजे

अजित पवारांनी भेटण्यासाठी फोन केला होता – संभाजीराजे

Subscribe

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरमध्ये खासदार संभाजीराजे यांचे पहिले आंदोलन यशस्वीपणे पार पडले आहे. यावेळी मराठा समन्वयकांशी बोलत असताना संभाजीराजे यांनी ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 4 जून रोजी आपल्याला भेटण्यासाठी फोन केला होता’ असा मोठा खुलासा केला आहे. पण, एकांतात भेट घेण्याचे आपण टाळले, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केले. खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवा खुलासा केला.

‘अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितले की, आम्ही आमच्या मागण्या मांडल्या आहेत. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटले हे सगळं काही मॅनेज झाले तर काय करायचे. त्यामुळे मी ठरवले आहे, भेटायचे असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते’ असा खुलासा संभाजीराजेंनी केला.

- Advertisement -

राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचे स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्वयक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ’, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसे कुणी बोलले नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासोबत चर्चेसाठी दारे उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे’ असे संभाजीराजे म्हणाले.

त्यांनी नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचे स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलेच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरण्याचा आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्वयकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावे, आपण मार्ग काढूया,’ असेही संभाजीराजे म्हणाले.

- Advertisement -

आज वर्षावर बैठक
मराठा क्रांती मूक आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांची गुरुवार 17 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -