घरमहाराष्ट्रसरकारने तरुणांच्या तोंडात आलेला घास काढून घेण्याच पाप केलंय; सुप्रिया सुळेंचा...

सरकारने तरुणांच्या तोंडात आलेला घास काढून घेण्याच पाप केलंय; सुप्रिया सुळेंचा घणाघात

Subscribe

मोदींनी काय दिल लॉलीपॉप, युवकांना काय दिल लॉलीपॉप अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आला

पुणे वार्ताहर : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज बालगंधर्व रंगमंदिर चौकात लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदींनी काय दिलं लॉलीपॉप, युवकांना काय दिलं लॉलीपॉपच अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तुम्ही राज्याचे पालक असून तुम्ही राज्यातील लाखो तरुणांवर अन्याय करण्याच काम केले आहे. या तरुण मुलांच्या तोंडात आलेला घास काढून घेण्याच पाप तुम्ही केले असल्याच सांगत शिंदे फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, आपल्या राज्याला वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प मेरिटवर प्रोजेक्ट मिळाला होता. तो आपल्याला मिळायला पाहिजे. तसेच तुम्हाला दुसरा मोठा प्रोजेक्ट देऊ हे जे सांगितल जात आहे, ते अगदी बाळबोध आणि बालिशपणाच विधान आहे. तसेच देशभरात आणि आपल्या राज्यात देखील बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आता हा प्रोजेक्ट बाहेर गेल्याने आपल्या अर्थव्यवस्थेवर निश्चित परिमाण होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे गांभिर्याने पहा आणि याकरिता सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन, यातुन मार्ग काढा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, तळेगाव येथे प्रोजेक्ट फायनल ठरला असताना आपल्या राज्यातून गुजरातमध्ये प्रकल्प गेला कसा? याचं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले पाहिजे. तसेच तुम्ही सत्तेत असल्याने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सत्तेत बसणं म्हणजे फक्त सत्कार घेणं आणि सिग्नल बंद करून सर्व सामान्य माणसांची गैरसोय करणे नसतं.सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी याला सत्ता म्हणतात असे सांगत शिंदे फडणवीस यांच्यावर टीका केली.


सांगली साधू मारहाण प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन, म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -