घरमहाराष्ट्रपुणे"फक्त मला काका म्हणू नकोस...", बारामतीच्या अजित पवारने पुण्यात घेतली राज ठाकरेंची...

“फक्त मला काका म्हणू नकोस…”, बारामतीच्या अजित पवारने पुण्यात घेतली राज ठाकरेंची भेट

Subscribe

राज ठाकरे यांच्या पुण्यातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार नावाचा कार्यकर्ता भेटला आणि महत्त्वाची बाब हा कार्यकर्ता देखील बारामतीचाच असल्याने कार्यालयाच्या ठिकाणी एकच हशा पिकला.

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत. राज ठाकरे यांनी सुद्धा मतदारसंघामध्ये भेटीगाठी वाढवल्या असून त्यांनी पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिक येथील मतदारसंघावर जास्त लक्ष देण्याचे ठरवले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानुसार, राज ठाकरे यांच्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – ललित पाटीलच्या शिवसेना प्रवेशावेळी राऊत संपर्क प्रमुख होते; नीलम गोर्‍हे यांचा गौप्यस्फोट

- Advertisement -

सध्या राज्यातील टोल दरवाढीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली असून त्याबाबतची बैठक राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पार पडली आहे. सध्या राज ठाकरे हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याकडून पुण्यातील पक्षाच्या मोठ्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांसह हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु या कार्यक्रमात घडलेल्या एका किस्स्याची सर्वत्र चर्चा करण्यात येत आहे. (Ajit Pawar of Baramati met Raj Thackeray in Pune)

राज ठाकरे यांच्या पुण्यातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात अजित पवार नावाचा कार्यकर्ता भेटला आणि महत्त्वाची बाब हा कार्यकर्ता देखील बारामतीचाच असल्याने कार्यालयाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. अजित पवार नावाचा कार्यकर्ता तो ही बारामतीचा असल्याचे राज ठाकरे यांना कळाल्यानंतर त्यांना हसू आले. त्यानंतर यांबाबत प्रतिक्रिया देत राज ठाकरे म्हणाले की, आमचा वसंत मोरे खूप शिस्तीने काम करणारा सहकारी आहे. त्याने उत्तमरित्या मतदारसंघाची बांधणी केली आहे. बारामती मतदारसंघ वसंतकडे आहे. याच मतदारसंघात आम्हाला अजित पवार सापडावा? त्याला पाहून मला कळेना हल्ली हे कुठल्याही पक्षात जातात की काय? परंतु, हा आपल्याबरोबरचा सहकारी आहे. फक्त आयुष्यात मला कधीही काका म्हणू नकोस, असे राज ठाकरे यांनी त्या कार्यकर्त्याला म्हणताच सर्वजण हसायला लागले.

- Advertisement -

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी सांगितले की, निवडणुका तोंडावर आहेत. महापालिकांच्या निवडणुका कधी होणार हे कोणालाच माहिती नाही. मी चौकशी केल्यावर सांगितले गेले की आता थेट 2025 ला या निवडणुका होतील. आपल्या देशात नेमके काय चालले आहे, तेच कळत नाहीये. परंतु, लोकसभेची निवडणूक पुढच्या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये होईल. त्यामुळे सगळ्यांनी तयारीला लागा. राज्याच्या राजकारणाचा जो काही विचका झाला आहे, यातून महाराष्ट्राला बाहेर काढूया. आपण शपथ घेऊया आणि महाराष्ट्राला यातून बाहेर काढूया. देशात सध्या ज्या प्रकारचे राजकारण सुरू आहे, जनतेला गृहित धरले जात आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -