घरमहाराष्ट्रअजित पवार संतापले; म्हणाले, 'तुमच्या घरात आया-बहिणी, लेकी-सुना नाहीत का?'

अजित पवार संतापले; म्हणाले, ‘तुमच्या घरात आया-बहिणी, लेकी-सुना नाहीत का?’

Subscribe

प्रियंका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. भाजप नेत्यांची ही टीका राजकीय पातळीवर न राहता वैयक्तिक पातळीवर पोहचली. त्यामुळे भाजप नेत्यांनी प्रियंगा गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेवर अजित पवार संतापले आहेत.

काँग्रेसने प्रियंका गांधी यांची सरचिटणीपदी नियुक्ती केल्यानंतर भाजप मंत्र्यांना धसका बसला आहे. दरम्यान, भाजप नेते विनोद नारायण झा यांनी प्रयंका यांच्याबाबत वादग्रसत् वक्तव्य केले होते. प्रियंका फक्त दिसायला सुंदर, त्यांना राजकीय नेतृत्व नाही, असे झा म्हणाले होते. भाजप नेत्यांच्या प्रियंका गांधींवरील या वक्तव्यांमुळे राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. त्यांनी या मुद्यावर भाजप मंत्र्यांचे कान पिळले आहेत. ‘प्रियंका गांधींचा उल्लेख तुम्ही ‘चॉकलेटी चेहरा’ म्हणून करता? तुमच्या घरात आया-बहिणी, लेकी-सुना नाहीत का?’, असा प्रश्न अजित पवार यांनी भाजप नेत्यांना विचारला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा सोमवारी कागल येथे पोहोचली. त्यावेळी श्रीमंत बापूसाहेब महाराज चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संग्रामसिंह कोलते-पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, संगीता खाडे, वसंतराव धुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘सरकारमध्ये धमक नाही’

अजित पवार यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली. ‘आज मोदी सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. शेतीशी काहीह संबंध नसणारे मंत्री मंडळात आहेत. आम्हीदेखील अर्थमंत्री होतो. अंगात धमक असली तरच नडलेल्यांना मदत करता येते. पण, या सरकारमध्ये ती धमक नाही’, अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

देशहिताचे सरकार नाही – जयंत पाटील

या सभेत जयंत पाटील यांनी देखील मोदी सराकारवर ताशेरे ओढले. ‘६० वर्षांपासून उभ्या असलेल्या महत्त्वाच्या संस्था मोडण्याचे काम मोदी सरकार करीत आहे’, अशा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्याचबरोबर ‘राफेल प्रकरणी आपल्यावर केस दाखल होईल, या भीतीने मोदी सरकारने मध्यरात्रीच सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना काढून टाकले. त्यामुळे हे देशहिताचे सरकार नाही’, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -