घरमहाराष्ट्रRane On Uddhav Thackeray : "भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू", नितेश...

Rane On Uddhav Thackeray : “भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू”, नितेश राणेंचा गौप्यस्फोट

Subscribe

उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अटी शर्ती न ठेवता मला भाजपामध्ये घ्या, अशी विनवणी ते भाजपाच्या वरिष्ठांकडे करू लागले आहेत, असा दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

तेजस्वी काळसेकर (सिंधुदुर्ग ) : राणे कुटुंबावर टीका करणारे उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत. सन 2019 च्या निवडणुकीत त्यांनी गद्दारी करून भाजप उमेदवारांच्या विरोधात उमेदवार उभे केले होते. ठाकरे यांचे उमेदवार हे 2014 आणि 2019 ला मोदींच्या करिष्म्यामुळे निवडून आले होते. आता तो काळ संपला आहे. पण हेच उद्धव ठाकरे सध्या भाजपमध्ये येण्यासाठी सेटलमेंट करत आहेत, असा दावा आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

कणकवली येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे बोलत होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात ज्या तीन सभा घेतल्या त्यात त्यांचे खासदार विनायक राऊत यांच्या निरोपाच्या सभा होत्या. जिल्ह्यात आल्यानंतर विकासावर बोलण्यापेक्षा राणे कुटुंबीयांवर बोलल्याशिवाय त्यांच्या सभा पूर्ण होत नाहीत. ठाकरे ज्या गद्दारीबाबत बोलतात होते ती गद्दारी उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर 2019 मध्येच केली होती. त्यामुळे माझ्या मतदारसंघात त्यावेळी युती डावलून उमेदवार उभा केला होता, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Aastha Train: रामलल्ला दर्शन स्पेशल; भाजपची मुंबईतून अयोध्येसाठी पहिली ट्रेन रवाना

राणे म्हणाले, ठाकरे आणि त्यांचा पक्ष आता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अटीशर्ती न ठेवता मला भाजपामध्ये घ्या, अशी विनवणी ते भाजपाच्या वरिष्ठांकडे करू लागले आहेत. त्यासाठी ते दिल्लीतील काही लोकांना ते भेटत आहेत. मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. संघाचे विचार माझ्यासाठी फार मोलाचे आहेत. मी संघाच्या विचारांचा अभ्यास करतो. त्यामुळे मी वैयक्तिक टीका करणार नाही. मी जनतेची सेवा करणारा आमदार आहे. सिंधुदुर्गातील राणेंची झुंडशाही संपली, असे सांगत ते बांदा ते खारेपाटणपर्यंत फिरणाऱ्या ठाकरेंना जिल्ह्यात आल्यावर राणेंचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Air pollution In Mumbai : वायू प्रदूषणाबाबतची तक्रार नोंदवा आता ‘मुंबई एअर’ App वर

भाजपाला तडीपार करणाऱ्यांकडे स्वतः चा पक्ष नाही

नितेश राणे म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करायची आणि दुसरीकडे महायुतीमध्ये येण्यासाठी आतुरता दाखवायची, विनाअट भाजपासाठी घालण्याकरित उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ‘अब की बार’ भाजपाला तडीपार करणाऱ्यांकडे स्वतःचा पक्ष नाही, मशाल हे चिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत राहल का प्रश्नचिन्ह आहे. भाजपाला तडीपार करण्याची यांची लायकी तरी आहे का ? स्वत:च्या कुटुंबाला घेऊन हs आता तडीपार होणार आहेl. दिशा सलियान केसचा निकाल लागू देत, मग कसे तडीपार व्हावे लागत हे कळेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली

Rane On Uddhav Thackeray : “भाजपामध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंची धडपड सुरू”, नितेश राणेंचा गौप्यस्फोट
Tejaswi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejaswi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -