घरमहाराष्ट्रभाजपावर दबाव टाकण्यासाठी 'मित्रपक्ष' एकत्र येण्याची शक्यता

भाजपावर दबाव टाकण्यासाठी ‘मित्रपक्ष’ एकत्र येण्याची शक्यता

Subscribe

लोकसभा निवडणुकीमध्ये युती झाल्यामुळे भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असताना आता भाजपावर दबाव टाकण्यासाठी 'मित्रपक्ष' एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना युतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

आधीच आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये युती झाल्यामुळे भाजपा-शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असताना आता मित्र पक्षाच्या नाराजीमुळे भाजपा-शिवसेना युतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजपाने युती करताना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा सोडणार हे अजूनही भाजपाकडून सांगण्यात न आल्यामुळे रामदास आठवले, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर हे मित्रपक्षाचे नेते नाराज आहेत. दरम्यान भाजपावर दबाव टाकण्यासाठी मित्रपक्षाने एकत्रित मोट बांधण्याची तयारी केल्याची माहिती मिळत आहे.

हा आहे मित्र पक्षाचा इरादा

नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती, महादेव जानकर यांचा रासप, विनायक मेटे यांचा शिवसंग्राम असे घटक पक्ष एकत्र करून भाजपाची डोकेदुखी वाढवण्याचा इरादा मित्र पक्षाचा आहे. दरम्यान सगळ्यात महत्वाचे म्हणजे रामदास आठवले यांनी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला कोकणात मदत करणार असल्याचे देखील जाहीर केले आहे.

- Advertisement -

आठवलेना मुंबईतून लढायचे

लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी’, अशी येथील जनतेची भावना असल्याचे रामदास आठवले यांनी घाटकोपर पूर्व कामराज नगर येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते. तसेच शिवसेनेला ही तेच वाटत आहे. पण ज्यांना वाटावं त्या भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावं, असं अजून वाटत नाही अशी नाराजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली होती. एकीकडे रामदास आठवले मुंबईतून जागा मागत असताना सदाभाऊ खोत हे देखील हातकणंगले येथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र अद्याप कोणताच सिग्नल मिळत नसल्याने खोत देखील नाराज आहेत. त्यामुळे आता या नाराज मित्रपक्षांना खुश करण्याचे मोठे आवाहन भाजपाकडे आहे.


वाचा – नितेश राणे घेणार महादेव जानकरांची भेट; कारण गुलदस्त्यात

- Advertisement -

वाचा – भाजपच्या ब्लॅकमेलिंगमुळेच काँग्रेसनं आमच्याशी युती केली नाही – प्रकाश आंबेडकर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -