घरमहाराष्ट्रकोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब; आरोपीला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब; आरोपीला ३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Subscribe

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी रात्री उशीरा बलात्कारासह विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करून आरोपील अटक केली आहे. अल्पेश अशोक देशमुख (३०, रा. पुसदा, जि. अमरावती), असं आरोपीचं नाव असून तो बडनेऱ्याच्या लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम करायचा. या प्रकरणावरुन सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पीडित तरुणी अमरावती येथे भावाकडे राहत असून एका मॉलमध्ये नोकरी करते. मॉलमधील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपर्कातील २० जणांचे २८ जुलैला ट्रॉमा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आले. अल्पेश देशमुख हा याच लॅबमध्ये कामाला होता. त्याने पीडित तरुणीला परत बोलावून तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली असून तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल, असं त्याने या तरुणीला सांगितलं. ही बाब या तरुणीने वरिष्ठ महिला सहकाऱ्याला कळवली होती. त्या दोघींनी महिला टेक्निशिअन नाही का, अशी विचारणा केली. त्यावर अल्पेश देशमुखने महिला टेक्निशिअन नसल्याचे सांगितले. तसंच तपासणीसाठी तुम्ही एका महिलेला सोबत घेऊ शकता, असंही म्हटलं. त्यानंतर टेक्निशियनने फिर्यादी तरुणीच्या गुप्तांगातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले. इतकंच नाहीतर तुमची चाचणी निगेटिव्ह असल्याचंही सांगितलं.

- Advertisement -

योनीद्वारे घेतलेल्या स्वॅब तपासणीबाबत तरुणीस शंका आल्याने तिने त्याबाबत भावाला सांगितलं. त्याने डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी अशाप्रकारे चाचणी करत नसल्याचं सांगितलं. यामुळे तरूणीने तडक बडनेरा पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीच्या आधारे ३५४, ३७६ या कलमांव्यतिरिक्त अॅट्रॉसिटी, आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून आरोपीला कठोर शासन केलं जाईल असं आश्वासन दिलं आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असून त्याला ३१ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

खासदार नवनीत राणा अन् चित्रा वाघ संतापल्या

भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि स्थानिक खासदार नवनीत राणा कौर यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या की, अमरावतीतील बडनेरात अत्यंत धक्कादायक घडली. कोरोनाच्या टेस्टिंगसाठी महिलेच्या गुप्तांगामधून स्वॅब घेण्यात आला, हे करण्याची हिंमत टेक्निशियनची झाली कशी? तो मुलीला कसं घेऊन गेला? असे अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत. सरकारने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वॅब टेस्टिंग फक्त नाकाद्वारे केली जाते. आज या मुलीने हिंमत केली म्हणून हा प्रकार समोर आला. राज्यात कोरोनाच्या नावाखाली ग्रामीण भागातील महिलांना काय काय प्रकार सहन करावा लागला असेल? अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. महिलांच्या जगण्याचा सन्मान हिरावला जात आहे, क्वारंटाईन सेंटरमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत, बाहेर नाहीत आणि आता या स्वॅब टेस्टिंगच्या नावाखाली कुठे काय घडलं असेल हे सांगता येत नाही. महिला सुरक्षेबाबत सरकारचं लक्ष नाही. अत्यंत वाईट आणि निंदनीय घटना महिलांसोबत घडत आहे, त्यामुळे महिलांबाबत बोलणारे नेते आता कुठे गेलेत? दिशा कायद्याचं काय झालं? महिलांची सुरक्षा पूर्णपणे देवाच्या भरवशावर आहे अशी टीका चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -