घरमहाराष्ट्रMaharashtra Politics: 2024 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका? फडणवसींपेक्षा बावनकुळेंची भूमिका वेगळी

Maharashtra Politics: 2024 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका? फडणवसींपेक्षा बावनकुळेंची भूमिका वेगळी

Subscribe

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार असल्याचे वक्तव्य करुन, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या अकांक्षांना कुंपण घातले आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी कोणाला कोणते पद द्यायचे हा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा असतो असे सांगून फडणवीसांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे.

राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार असल्याचे वक्तव्य करुन, भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या अकांक्षांना कुंपण घातले आहे, मात्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी कोणाला कोणते पद द्यायचे हा निर्णय केंद्रीय संसदीय बोर्डाचा असतो असे सांगून फडणवीसांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे.

२०२४ विधानसभा कोणाच्या नेतृत्वात लढवणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवण्याचा अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) वक्तव्यापेक्षा वेगळ भूमिका मांडली आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुख्यमंत्रीपदावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची टांगती तलवार आहे. सत्ता संघर्षाचा निकाल एकनाथ शिंदेसह त्यांच्या बंडखोर गटाविरोधात गेल्यास त्यांना आमदारकीसह मुख्यमंत्रीपद गमवावे लागणार आहे. यामुळे राज्यात पुढील मुख्यमंत्री कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, फडणवीसांच्या नागपूरात त्यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी सुरु झाली आहे. ते बॅनर त्यांनी तातडीने उतरवण्यास सांगितले आहे.

शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात भाजपची सत्ता येणार आणि फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी गेल्यावर्षी चर्चा होती. मात्र ऐनवेळी शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि अनिच्छेने फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे लागले होते. भाजपचे सर्वाधिक आमदार असून ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या नेत्याला राज्याचे प्रमुख पद द्यावे लागले, ही सल भाजपच्या अनेक नेत्यांमध्ये आजही आहे. त्यात बावनकुळे देखील आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस सध्या कर्नाटक प्रचार दौऱ्यावर आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे नाराज असून ते त्यांच्या गावी साताऱ्याला गेल्याची चर्चा कालपासून (मंगळवार) राज्यात सुरु आहे. त्यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले की, ‘एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकाही त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील. त्यांच्यात नेतृत्वात आम्ही विजयी होऊ आणि पुन्हा जिंकून दाखवू.’
फडणवीसांच्या या वक्तव्यबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना विचारले असता त्यांनी भाजपचा कोणताही निर्णय हा एखादी व्यक्ती घेत नाही, तर पक्षाच्या संसदीय मंडळाकडून घेतला जातो असे सांगत फडणवीसांपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. एक प्रकारे आगामी निवडणूक ही भाजप नेत्याच्याच नेतृत्वात होईल, मात्र तो नेता कोण असले हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. शिंदेना मुख्यमंत्री करणे हे भाजपमधील अनेक नेत्यांना रुचलेले नाही. चंद्रकांत पाटील यांनीही आम्ही मनावर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारला असल्याचे मागील वर्षीच स्पष्ट केले होते. त्याच्याही पुढे जात बावनकुळे यांनी आता स्पष्ट केले आहे की, निवडणुका कोणाच्या नेतृत्वात होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे केंद्रीय संसदीय बोर्डाच्या बैठकीत ठरते. कोणाला आमदार, खासदारकीची उमेदवारी द्यायची? कोणाला मंत्री करायचे, कोणाला मुख्यमंत्री बनवायचे? हे सर्व केंद्रीय संसदीय बोर्डाच्या बैठकीत निर्णय घेतले जातात. हे निर्णय प्रदेशाध्यक्ष किंवा इतरांच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत. ‘

हेही वाचा : आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्वात? मुख्यमंत्री म्हणतात, चिंता करू नका…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -