घरमहाराष्ट्रअमोल मिटकरींकडून भाजपा नेत्यांना आव्हान, 'तो' फोटो शेअर केल्यास देणार एक लाख...

अमोल मिटकरींकडून भाजपा नेत्यांना आव्हान, ‘तो’ फोटो शेअर केल्यास देणार एक लाख रुपये

Subscribe

Amol Mitkari | महापुरुषांवरून सुरू असलेल्या वादावरून विरोधक-सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात केली आहे. यावरूनच अमोल मिटकरी यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी आव्हान दिलं आहे. 

मुंबई – महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये कलगीतुरा रंगला असून कोण कसा आरोप-प्रत्यारोप करतोय यात स्पर्धाच सुरू आहे. त्यातच, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (NCP Leader Amol Mitkari) यांनी आज एक आव्हान करत चक्क एक लाख रुपयांचं रोख बक्षीसच जाहीर करून टाकलंय.

आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, चित्राताई वाघ, प्रवीण दरेकर यांच्या घरात बाबासाहेबांचा किंवा महात्मा फुलेंचा फोटो असल्यास त्यांनी शेअर करावा व एक लाख रुपये बक्षीस माझ्याकडून रोख घेऊन जावेत. ओठांवर बाबासाहेब आणि पोटात गोळवलकर असणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

- Advertisement -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भिक मागून शाळा चालवल्या असं वादग्रस्त वक्तव्य तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. त्यावरून चंद्रकांत पाटलांवर तुफान टीका झाली. त्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असं वक्तव्य केलं होतं. यावरून भाजपाने राऊतांवर टिकेचे बाण सोडले. तसंच, भाजपाच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत गरळ ओकल्याने महाविकास आघाडी आज महामोर्चा आयोजित केला आहे.

हेही वाचा – हसावे का रडावे कळत नाही…, ‘ठाणे बंद’वरून जितेंद्र आव्हाडांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा

- Advertisement -

दरम्यान, महापुरुषांवरून सुरू असलेल्या वादावरून विरोधक-सत्ताधारी आमने सामने आले आहेत. दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करायला सुरुवात केली आहे. यावरूनच अमोल मिटकरी यांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी आव्हान दिलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -