घरताज्या घडामोडीशरद पवार आखाड्यात असेपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही - अमोल मिटकरी

शरद पवार आखाड्यात असेपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही – अमोल मिटकरी

Subscribe

ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर दुसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसत आहे. तसेच ते आता गुवाहाटीमध्ये आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आखाड्यात असेपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसेच काही आमदारांची व्हाय.बी. चव्हाण सेंटरला बैठकही घेतली. या बैठकीनंतर अमोल मिटकरी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हे तीन पक्षांचे सरकार आहे. काही झाले तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. भाजपसोबत जाण्याचा प्रश्न नाही, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. शरद पवार यांनी आमदारांशी चर्चा करून त्यांचे अभिप्राय विचारले, मनातील भावना जाणून घेतल्या असेही ते म्हणाले.

आताच्या घडीला राज्यावर आणि महाविकास आघाडी सरकारवर संकट आहे. शिवसेनेच्या बंडखोरांना भाजप रसद पुरवत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दिल्लीतून हे सगळे फंडिंग होत आहे, असेही सांगितलं जात आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी जोपर्यंत शरद पवार मैदानात आहेत, तोपर्यंत भाजपचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ठाकरे-शिंदे जोडी राम-लक्ष्मणाची, रामराज्याचा संघर्ष सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल; दिपाली सय्यद यांचे ट्विट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -