घरनवी मुंबई"पालघरवर बोलणाऱ्यांनी 'खारघर'वर बोलावे", 'या' नेत्याची भाजपवर जहरी टीका

“पालघरवर बोलणाऱ्यांनी ‘खारघर’वर बोलावे”, ‘या’ नेत्याची भाजपवर जहरी टीका

Subscribe

आता आणखी एका नेत्याने या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आलेल्या श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपवर जहरी टीका केलीय.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असला तरी या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. या सोहळ्यात उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री सदस्यांचा उष्माघात झाला. या कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्या श्री सदस्यांचा आकडा १३ पर्यंत पोहोचला आहे. या घटनेवरून आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. विरोधकांना मात्र टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळालं आहे. आता आणखी एका नेत्याने या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात आलेल्या श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून भाजपवर जहरी टीका केलीय.

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून श्री सदस्य आले होते. मात्र, या कार्यक्रमानंतर उष्माघातानं तब्बल १३ जणांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावरून भाजपला टार्गेट केलंय. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्वीट शेअर केलंय. “पालघर” वर बोलणाऱ्यांनी “खारघर” वर बोलावे…, असं या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलंय.

- Advertisement -

पालघरच्या गडचिंचले गावात गावकऱ्यांनी साधुंसह तिघांची ठेचून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेवरून भाजपनं त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करत त्यावेळी अनेक भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे श्री सदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून अमोल मिटकरी यांनी थेट भाजपवर निशाणा साधलाय. “पालघरवर बोलणाऱ्यांनी ‘खारघर’वर बोलावे” असं ट्वीट करत पालघर हत्याकांड प्रकरणी टीका करणाऱ्या सर्व भाजप नेत्यांना आता या घटनेवर बोलण्याचं आव्हान दिलंय.

तसंच एका खाजगी वाहिनीला मुलाखत देताना अमोल मिटकरी यांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिलीय. “शिंदे साहेब, सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं सांगतानाच या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”, अशी मागणीच अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. पाण्यासारखा पैसा ओतला. मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही? केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळलं नाही का? मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं आहे. या घटनेचं राजकारण करू नये म्हणून सांगितलं गेलं. राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण शिंदे साहेब, एवढी माणसं मरत असतील तर सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. याबाबत ते याबाबत ते राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -