घरताज्या घडामोडी'आनंदवन'मधील कुष्ठरोग रुग्ण तयार करणार ४० हजार 'फेस मास्क'

‘आनंदवन’मधील कुष्ठरोग रुग्ण तयार करणार ४० हजार ‘फेस मास्क’

Subscribe

बाबा आमटेंचे 'आनंदवन' सरकारला तब्बल ४० हजार फेस मास्क पुरवणार आहेत.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावले जात आहे. मात्र, सध्या बाजारात मास्क उपलब्ध नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान, या कोरोनाविरोधात लढण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची तिसरी पिढी देखील सज्ज झाली आहे. आनंदवन या बाबा आमटेंच्या कुष्ठरोगांसाठी असलेल्या संस्थेने कापडाची थ्री लेयर मास्क निर्मिती सुरु केली आहे. विशेष म्हणजे हे मास्क आनंदवनमधील मूकबधिर, कुष्ठरोगी आणि मानसिक रुग्ण असे दिव्यांग व्यक्ती तयार करणार आहेत.

३ हजार मास्क तयार

- Advertisement -

सकरारकडून आनंदवनकडे ४० हजार मास्कची मागणी करण्यात आली होती. त्याप्रमाणे आतापर्यंत ३ हजार ६०० मास्क बनवून तयार झाले आहेत. तर १ हजार ३९० मास्कचे वाटप देखील करण्यात आले आहे. याशिवाय मास्कच्या निर्जुंतिकीकरणासाठी देखील दोन खास पाऊच बनवले जात आहेत. संस्थेच्या हेमलकसा येथील लोकबिरादरी आणि आनंदवन या दोन प्रकल्पांमध्ये प्रतिबंधात्मक सुरक्षा साधनांची निर्मिती केली जात आहे, असे आनंदवनच्या डॉ. शीतल आमटे यांनी सांगितले आहे.

मास्क ठेवण्याची सुविधा

- Advertisement -

मास्क वापरल्यानंतर अनेक जण मास्क कुठेही टाकून देतात. मात्र, त्यातून संसर्ग पसरण्याचा संभव असल्याने वापरलेले आणि न वापरलेले मास्क ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र कापडी पाकिटेही तयार केली आहेत.


हेही वाचा – साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -