घरताज्या घडामोडीलॉकडाऊनचा फटका : दोरखंड न दिसल्याने स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू

लॉकडाऊनचा फटका : दोरखंड न दिसल्याने स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू

Subscribe

लॉकडाऊनमुळे शहरातील चौकाचौकात नाकाबंदी करण्यात आली असून बॅरीकेट्स व दोरखंडाने रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरात स्वच्छता करण्यासाठी सोमवारी (दि.६) पहाटे माजी स्वच्छता कर्मचारी दुचाकीवरुन पत्नीसमवेत जात असताना दोरखंड न दिसल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक, माजी स्वच्छता कर्मचार्‍याचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना पेठ रोडवरील शनी मंदिराजवळ घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

किशोर चव्हाण (५३) असे मृत सफाई कामगाराचे नाव आहे. राजुबेन किशोर चव्हाण(५२) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शहरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यांवरुन वाहने जावू नयेत, यासाठी चौकाचौकात बॅरिकेट्स व दोरखंडाने रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, अनेकांना रात्रीच्यावेळी दोरखंड दिसत नसल्याचे अपघातावरुन पुढे आले आहे. रविवार कारंजा येथे स्वच्छता करण्यासाठी सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास किशोर चव्हाण हे दुचाकीवरुन पत्नीसमवेत आरटीओ कार्यालयाकडून जात होते. त्यांनी हेल्मेट परिधान केले नव्हते. ते पेठ रोडवरील शनी मंदिराजवळ आले असता रस्ता बंदसाठी लावण्यात आलेला दोरखंड त्यांना दिसला नाही. त्यांच्या दुचाकीची रस्त्याला धडक बसली. या अपघातात किशोर चव्हाण जागीच ठार झाले. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -