घरमहाराष्ट्रअनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनिल देशमुख यांचे वकील आज न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करणार असून या अर्जावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द करत देशमुख यांना १२ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवलं. दरम्यान, आज त्यांची कोठडी संपणार होती. त्यामुळे ईडीने त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा ठपका ठेवत ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडीने पाच वेळा समन्स बजावून देखील चौकशीला गैरहजर राहणारे अनिल देशमुख सोमवारी १ नोव्हेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर झाले. त्यानंतर त्यांची तब्बल सडे बारा तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली.

- Advertisement -

ईडीच्या आरोपानुसार अनिल देशमुख यांना ४ कोटी ७० लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले होते. ते त्यांनी ऋषिकेश देशमुख यांना दिले. त्यानंतर दिल्लीतील पेपर कंपनीच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानाच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यात परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारता येत नाही.

एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून रोकड हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा, असाही संशय ईडीने व्यक्त केला आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -