घरBudget 2024Anil Parab : 'पार्टी विथ डिफरंस' कशासाठी? आमदारांच्या गैरवर्तनावरून भाजपावर निशाणा

Anil Parab : ‘पार्टी विथ डिफरंस’ कशासाठी? आमदारांच्या गैरवर्तनावरून भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी पोलीस बदल्यांवरून विधानपरिषदेत झालेल्या चर्चेवेळी अनिल परब यांनी आमदारांच्या गैरवर्तनावरून भाजपावर निशाणा साधला. ‘पार्टी विथ डिफरंस’ कशासाठी? अशी विचारणार त्यांनी केली आहे. (Anil Parab Party with difference for what BJP targeted for misbehavior of MLAs)

हेही वाचा – Chandrakant Patil : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा; विद्यापीठांमधील फी होणार माफ

- Advertisement -

राज्यातील सध्याच्या आमदार गोळीबार प्रकरणावरून बोलताना अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केले की, ‘हिंदू डॉन’ही कोणी संकल्पना आणली? तुम्हाला आता हिंदू डॉन कशाला पाहिजेत? पुण्यातले तुमचे गुंड मंत्रालयात येऊन रिल्स करतात. पोलीस आयुक्तांनी यांना गुडघ्यावर बसवायला हवे होते. नंतर परेडमध्ये पोलीस त्यांच्या कानात सांगतात की, असे करू नका. ही पोलिसांची पद्धत आहे का? पोलिसांचे खच्चीकरण का करत आहात? एक आमदार हवेत गोळीबार करतो. एक आमदार हात पाय तोडायच्या धमक्या देतो. एक आमदार पोलीस त्यांच्या बायकोला फोटो दाखवतील म्हणतो, अशा प्रकारे ‘पार्टी विथ डिफरंस’ कशासाठी अशी विचारणा अनिल परब यांनी केली आहे.

एक आमदार गोळीबार करतो. बंदुकीतून कोणी गोळी झाडली हे पब्लिक डोमेनमध्ये आणा. खरं तर हे ट्रिपल इंजिन सरकार एवढं जोरात धावतंय की मागे डब्बे राहतात की नाही हेही बघत नाही. काही बिनकामाचे डबे जोडलेत. हे बिनकामाचे डब्बे तुमचाही डब्बा कुठेतरी डिसमेंटल करून टाकतील, असा टोलाही अनिल परब यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – Anil Parab : पोलिसांच्या छत्रछायेखाली डान्सबार सुरू, रेट कार्डही ठरलेले; परबांचा गंभीर आरोप

एसआयटी स्थापनेचं पुढे काय झालं

अनिल परब म्हणाले की, 47 हजारांसाठी मला सात दिवस बसवून ठेवलं. मात्र एक आमदार सांगतोय की, माझे मुख्यमंत्र्यांकडे शेकडो कोटी रूपये आहेत. मग आता ईडी कुठे गेली. एका एजंटकडे ईडीच्या दीडशे फाईल्स सापडल्या. एवढे दिवस नुसत्या एसआयटी स्थापन केल्यात, पण त्याचं पुढं तुम्ही काय केलं याची माहिती द्या. कोरोना असताना लोकांच्या घरात जायला आम्ही पाहिजे असं तुम्ही म्हणत होतात. मग आता तुम्ही फ्री आहात करा, लोकांची कामं का होतं नाहीत? असा प्रश्नही अनिल परब यांनी महायुती सरकारला विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -