घरBudget 2024Anil Parab : पोलिसांच्या छत्रछायेखाली डान्सबार सुरू, रेट कार्डही ठरलेले; परबांचा गंभीर...

Anil Parab : पोलिसांच्या छत्रछायेखाली डान्सबार सुरू, रेट कार्डही ठरलेले; परबांचा गंभीर आरोप

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज तिसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी 260 च्या प्रस्तावावर बोलताना मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी सांगितले की, मुंबईत डान्स बार सुरू आहेत. ज्या डान्सबारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी असेल तो डान्स सुरू असतो आणि पोलिसांचे रेट कार्डही ठरलेले आहेत. (Dance bar started under police umbrella rate card also fixed Serious allegations by Anil Parab)

हेही वाचा – Budget Session : सर्वच गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या; ठाकरे गटाची मागणी

- Advertisement -

अनिल परब म्हणाले की, या मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजबारा निघालेला आहे. तुमचे लोकप्रतिनिधी सगळे बेलगाम झाले आहेत. प्रत्येकजण बंदुक घेऊन आहे. हा पक्ष राहिलेला नाही, ही गुंडांची टोली झालेली आहे आणि गँगवॉर सुरू आहे. एकमेकांचा काटा काढण्याचं काम चालू आहे. थोड्यापूर्वी दरेकरांना सांगितलं की, पोलीस बदल्यांमध्ये भ्रष्टाचार नाही आहे. मी आज नोटीस दिली नाही, म्हणून नावं सागंत नाही. पण खरं तर एसपी आमदारांना वाटून दिले आहे. एसपीने महिन्याला 25 लाख रुपये यांना पोचवायचे, हा भ्रष्टाचार नाही आहे? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार, पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार सर्वच चालू आहे. यांनी दुकान नाहीतर भ्रष्टाचाराचा मॉल उघडला आहे. मुंबईमध्ये डान्सबारचा विषय आहे. बनसोडे तुम्हाला वेळ असेल तर चला माझ्यासोबत तुम्हाला मुंबईतले डान्सबार किती उघडे आहेत, ते दाखवतो. ज्या डान्सबारच्या बाहेर पोलिसांची गाडी उभी असल्यावर समजायचं तो डान्सबार सुरू आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस गिऱ्हाइकांना घरी सोडायचं काम करतात, असा गंभीर आरोप अनिल परब यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Vijay Wadettiwar : “मोदींची गॅरंटी” कधीही पूर्ण न होणारी; ‘चाय पे चर्चेचा’ संदर्भ देत वडेट्टीवारांची टीका

मुंबई पोलिसांचे रेट कार्ड ठरलेत

मुंबई पोलिसांचे रेट कार्ड ठरले आहेत. ए. के. बार पोलीस स्टेशन, कस्तुरबा पोलीस स्टेशनचे रेट कार्ड वेगवेगळे ठरले आहेत. डीसीपींचे रेट ठरत आहेत. हे काय चाललं आहे आणि कोण ठरवतं आहे हे? जर हे नाही थांबलं तर आम्हाला नाव सांगावी लागतील. मग आमच्यावर काय केसेस व्हायच्या च्या होऊ दे, असा इशारा अनिल परब यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -