घरमहाराष्ट्रअनिल परब यांना NIA उचलून नेणार, नारायण राणे यांची भविष्यवाणी

अनिल परब यांना NIA उचलून नेणार, नारायण राणे यांची भविष्यवाणी

Subscribe

अंबानींच्या निवासस्थानाबाहेर स्फोटक ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझेने एक पत्र लिहून खळबळ उडवून दिली. या पत्रात त्याने परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी अनिल परब यांच्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. अनिल परब यांना NIA उचलून नेणार, असं नारायण राणे म्हणाले. राणे पत्रकार परिषदेत बोलत होते.

सचिन वाझेच्या लेटर बॉम्ब प्रकरणी अनिल परब यांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. वाझेच्या पत्रानंतर आपण स्वत: चौकशीला तयार आहोत, असं अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं. मात्र, नारायण राणे यांनी अनिल परब यांच्याविषयी भविष्यवाणी केली. अनिल परब यांना NIA तपासासाठी घेऊन जाईल. एनआयएकडून फक्त राज्यपालांची परवानगी घेतली जाईल. अनिल परब चौकशीला तयार नसतील तर ते त्यांना उचलून नेतील, असं विधान राणे यांनी केलं आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचीही चौकशी होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लेटरबॉम्ब टाकला. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नोकरीत पुन्हा घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. जून, ऑगस्ट २०२० मध्ये SBUT ट्रस्टीकडून ५० कोटी गोळा करण्याचा आरोप अनिल परबांवर करण्यात आला आहे. जानेवारी २०२१ मध्ये मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्याचाही आरोप आहे.


हेही वाचा – जनाची नाही, किमान मनाची बाळगा’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -