घरमहाराष्ट्रआण्णाभाऊंच्या भगिनी जाईबाई साठे यांनी घेतला अखेरचा श्वास

आण्णाभाऊंच्या भगिनी जाईबाई साठे यांनी घेतला अखेरचा श्वास

Subscribe
अण्णाभाऊ साठे यांची सख्खी बहीण जाईबाई साठे यांचे मुंबईत मंगळवारी निधन झाले. घाटकोपरमधल्या चिरागनगर येथे त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. संध्याकाळी साडेचार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साठे घराणे हे शूरवीर आणि कलेचा वारसा असलेले घराणे म्हणून ओळखले जायचे. अण्णाभाऊ जेव्हा नवीन पोवाडे, गाणी लिहित तेव्हा ते आधी जाईला गाऊन दाखवत. अण्णांच्या अनेक गीतांना जाईबाई चाल बसवून देत. घरी धुणी-भांडी करताना जाईबाई अण्णांची नवी गाणी गुणगुणत असत. अण्णांच्या सोबत जाईबाई अनेक आंदोलनात सहभागी होत. कॉ. डांगे, कॉ. मोरे, कॉ. साळवी अशा नेत्यांबरोबरच सिनेकलावंत ए. के. हंगल, के. ए. अब्बास, राज कपूर, बलराज साहनी या मान्यवरांशी त्यांचा चांगला परिचय होता.
पती आणि मुलाचेही ऐन तारुण्यात निधन झाले. तेव्हा एका पारशी कुटुंबाच्या घरी धुणी-भांडी करुन जाईबाइंर्नी सून आणि नातवंडे सांभाळली. कष्ट करून स्वतःचे घर बांधले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. समाजाला परिवर्तनाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावोगावी भेटी देत होत्या.
१४ ऑक्टोबर २०१२ रोजी जाईबाई यांना भेटण्याचा योग आला होता. त्यांचे नातू आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश भगत हे आम्हाला घ्यायला घाटकोपर रेल्वे स्टेशनवर आले होते.  ‘शंकर भाऊ साठे : व्यक्तित्व आणि कर्तृत्व ङ्क या विषयावर मी तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पीएच.डी करीत होतो. वालूबाई आणि भाऊराव सिद्धोजी साठे यांच्या पोटी भागू , तुकाराम, शंकर आणि जाई अशी चार मुले जन्मली. १९३१ साली हे कुटुंब वाटेगावहून मुंबई येथील भायखळ्याच्या चांदबिबी चाळीत रहायला आले. तेव्हा जाईबाई चार पाच वर्षांच्या होत्या.
भाऊरावांनी जाईला भायखळा शाळेत प्रवेश घेतला. शाळेत येणाऱ्या मुलांच्या अंगाचा वास येतो म्हणून जाई शाळेतून घरी येताना दररोज सार्वजनिक नळावर आंघोळ करूनच येत असे. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे अनेकदा आजारी पडे. त्यामुळे वालूबाइंर्नी तिची शाळाच बंद केली. पुढे अण्णांच्या लाल बावटा कलापथकातील एक कलावंत तुकाराम भगत यांच्याशी जाईबाइंर्चा विवाह झाला.
पती आणि मुलाचेही ऐन तारुण्यात निधन झाले , तेव्हा एका पारशी बाईच्या घरी धुणी भांडी करुन जाईबाइंर्नी सून आणि नातवंडे सांभाळली. कष्ट करून स्वतःचे घर बांधले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. समाजाला परिवर्तनाच्या प्रवाहात आणण्यासाठी गावोगावी जात होत्या. अण्णाभाऊंप्रमाणेच शंकर भाऊंनीही संयुक्त महाराष्ट्र चळवळीत काम केले. शाहीरी गाजवली. खूप छान लेखन केले मात्र समाजाने त्यांना उपेक्षित ठेवले. ही खंत जाईबाइंर्ना होती.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -