घरमहाराष्ट्रमतपत्रिकेने निवडणूक घेऊन दाखवा; ठाकरे बंधूंचे मोदींना आव्हान

मतपत्रिकेने निवडणूक घेऊन दाखवा; ठाकरे बंधूंचे मोदींना आव्हान

Subscribe

तंत्र, मंत्र, यंत्र जे काही आहे, ते एकदा होऊनच जाऊ द्या. भाजपनेही एकदा या देशात मतपत्रिकेने मतदान होऊ द्यावे. खुल्या वातावरणात मतपत्रिकेने या देशात मतदान घ्या आणि एकदाच काय ते संशयपिशाच्च दूर करा, असे म्हणत उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाले नसले तरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जेडीएस या निवडणुकीत ‘किंग मेकर’ ठरणार असे दिसत आहे. त्यादृष्टीने काँग्रेसने जेडीएसच्या मदतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, कर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मात्र धाबे दणाणले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने या बैठकीसाठी मंत्री, आमदार, नगरसेवकांना आणि पदाधिकांऱ्यांना  बोलावून घेतले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजप निवडणुका जिंकते, पण पोटनिवडणुका हरते, अशा शब्दात भाजपला कोपरखळी मारली.

- Advertisement -

पालघरमध्ये सेना जिंकणार

कर्नाटकमध्ये जे जे जिंकले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो….भाजपचेही अभिनंदन, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. सोबतच, कर्नाटकमधील नव्या सरकारने सीमा भागातील मराठी माणसाला न्याय द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ज्या राज्यांनी आत्तापर्यंत भाजपच्या राजवटीचा अनुभव घेतला आहे तिथली जनता त्यांचा अनुभव मतपेटीतून व्यक्त करते आणि म्हणूनच भाजप निवडणुकीत जिंकते. पोटनिवडणुकीत मात्र हरते हे आतापर्यंतचे चित्र आहे. पालघर पोटनिवडणूक आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील भाजपच्या विजयामागे एव्हिएम मशीनचे गौडबंगाल आहे, असे सूचित केले आहे. राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जोडण्यावरून प्रचंड विरोध केला आहे. अशातच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयावर राज ठाकरे यांनी अवघ्या एका शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करत, विजयोत्सवात रंगलेल्या भाजपाला टोला हाणला आहे. राज म्हणाले ‘एव्हीएम मशीन की जय!’… राज ठाकरे हे नेहमीच आपल्या सभांमधून भाजपाचा, मोदींचा तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांचा समाचार घेत असतात. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील कार्याची वाहवा करणारे पहिले नेतेदेखील राज ठाकरेच होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -