घरमहाराष्ट्रअकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Subscribe

दहावीचा निकाल कमी लागल्याने निर्माण झालेल्या अकरावी प्रवेशाचा तिढा अखेर मंगळवारी सरकारकडून सोडवण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूरमधील नामांकित कॉलेजमध्ये पाच ते दहा टक्क्यांनी जागा वाढवण्याबरोबरच सरकारकडून अकरावी प्रवेशाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. सरकारकडून प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अकरावी प्रवेशाचे जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बायफोकलची पहिली यादी 25 जून रोजी तर जनरल अभ्यासक्रमांची पहिली यादी 1 जुलैला जाहीर होणार आहे. कॉलेजांचे 70 टक्के प्रवेश झाल्यानंतर त्यांना कॉलेज सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेनंतर संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी ही पूर्णत: कॉलेजवर असणार आहे. तसेच शिल्लक राहिलेल्या जागा या मॅनेजमेंट व इन हाऊस कोट्यासाठी वेबसाईटवर वेळोवेळी कॉलेजांना माहिती देण्यात येणार आहे.

- Advertisement -

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक

– बायफोकल विषयांसाठी दुसर्‍या टप्प्यातील अर्ज भरणे – 19 ते 23 जून
मेरिट लिस्ट कॉलेजकडून जाहीर करण्यात येईल व कॉलेजकडून कोट्याची माहिती जाहीर करण्यात येईल.
– बायफोकल व्यतिरिक्त अन्य शाखांच्या टप्पा 1 व 2 चे अर्ज भरणे – 19 ते 29 जून (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– बायफोकलची पहिली यादीचे ऑडिट – 24 जून (दुपारी 2 वाजता)
– बायफोकलची पहिली यादी जाहीर – 25 जून (सायंकाळी 6 वाजता)
– बायफोकलच्या पहिल्या यादीतील ऑनलाईन अ‍ॅडमिशन – 26 ते 27 जून (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– जनरल मेरिट लिस्ट जाहीर – 1 जुलै (सकाळी 11 वाजता)
– शिक्षण उपसंचालकांकडे अर्जामधील दुरुस्तीसाठी प्रस्ताव – 2 ते 3 जुलै (सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– जनरल मेरिट लिस्टचे ऑडिट – 5 जुलै (दुपारी 2 वाजता)
– पहिली जनरल मेरिट लिस्ट जाहीर – 6 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
– पहिल्या जनरल मेरिट लिस्टनुसार ऑनलाईन प्रवेश – 8 ते 9 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– पहिल्या जनरल मेरिट लिस्टनुसार ऑनलाईन प्रवेश – 10 जुलैला (सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत)
– कट ऑफ लिस्ट आणि शिल्लक जागांची वेबसाईटवर माहिती जाहीर – 10 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
– अर्जाचा टप्पा 1 व 2 भरण्याची व दुसरा भाग बदलण्याची संधी – 11 व 12 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– दुसरी मेरिट लिस्टची ऑडिट प्रक्रिया – 16 व 17 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– दुसरी मेरिट लिस्टची ऑडिट प्रक्रिया – 18 जुलै (सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत)
– वेबसाईटवर रिक्त जागा जाहीर – 18 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
– अर्जाचा टप्पा 1 व 2 भरण्याची व दुसरा भाग बदलण्याची संधी – 19 व 20 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– ऑडिटसाठी तिसरी जनरल मेरिट लिस्ट उपलब्ध – 22 जुलै (दुपारी 2 वाजता)
– तिसरी जनरल मेरिट लिस्ट जाहीर – 23 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
– तिसर्‍या जनरल मेरिट लिस्टचे प्रवेश – 24 व 25 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– तिसर्‍या जनरल मेरिट लिस्टचे प्रवेश – 26 जुलै (सकाळी 11 ते दूपारी 3 वाजेपर्यंत)
– कट ऑफ लिस्ट व रिक्त जागा जाहीर – 26 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
– अर्जाचा टप्पा 1 व 2 भरण्याची व दुसरा भाग बदलण्याची संधी – 27 व 29 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– विशेष राऊंडसाठी मेरिट लिस्टचे ऑडिट – 30 जुलै (दुपारी 2 वाजता)
– विशेष मेरिट लिस्ट जाहीर – 31 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
– विशेष मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश – 1 व 2 ऑगस्ट (सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
– रिक्त जागांची यादी वेबसाईटवर जाहीर – 3 ऑगस्ट (सकाळी 10 वाजता)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -