घरCORONA UPDATECoronavirus : धारावीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण!

Coronavirus : धारावीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण!

Subscribe

धारावीत कोरोनाचे ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी आणखी एका २१ वर्षी व्यक्तीचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

धारावीत कोरोनाचे ४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी आणखी एका २१ वर्षी व्यक्तीचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धारावीतील ६० फुट रोडवरील मदीना नगर येथे राहणारी ही व्यक्ती असून तो नवी मुंबईतील प्रयोगशाळेत तंत्रज्ञ काम करत आहे. २४ तारखेपर्यंत तो कामावरच होता आणि २९ मार्चपासून त्याला लक्षणे जाणवू लागली होती. त्यामुळे या भागाला बाधित क्षेत्र घोषित करून निकटच्या ५ लोकांना व आसपासच्या लोकांना क्वारंटाईनमध्ये हलवण्यात आले आहे. त्यामुळे धारावीसह जी-उत्तर विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

धारावीतील मागील चार दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे धारावी जस्मिन मिल रोड येथील बलिगा नगर, धारावी मुख्य रस्त्यावरील वैभव अपार्टमेंट, धारावीतील मुकुंद नगर येथील शक्ती चाळ व मदिना नगर आदी भाग बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. धारावीत आतापर्यंत पाच रुग्ण तर इतर भागांमध्ये २ रुग्ण अशाप्रकारे सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यासर्व रुग्णांच्या अत्यंत निकटच्या एकूण ५७ निकटच्या लोकांना व त्याखालोखाल संपर्कात आलेल्या १८७ लोकांना क्वारंटाईनमध्ये हलवण्यात आले आहे. त्यामुळे यासर्व भागांना बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यामुळे येथील  ३४५० लोकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले, असून तेथील कुटुंबांना आवश्यकतेनुसार जीवनाश्वक वस्तूंसह भाजीपाला व इतर सुविधा पुरवल्या जात आहे. तसेच या विभागांमध्ये जंतूनाशक फवारणीही केली जात असल्याचे महापालिका जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

 

जी-उत्तर विभागाती आढळून आलेले पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या : ७

- Advertisement -

धारावीतील रुग्णांची संख्या : ५

धारावी वगळता रुग्णांची संख्या : २

एकूण निकटच्या संपर्कात आलेली लोक : ५७

कमीप्रमाणात संपर्कात आलेली लोक : १८७

एकूण बाधित क्षेत्रांची संख्या  : ५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -