शपथविधी होताच शिंदे पोहोचले गोव्यात, बंडखोर आमदारांकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होताच एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात पोहोचले. ज्या हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांना ठेवण्यात आले आहे, त्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे मध्यरात्री दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये पोहोचताच शिंदे गटातील सर्व आमदारांनी पेढा भरवत त्यांचं अभिनंदन केलं.

cm eknath shinde

तब्बल दहा दिवस सुरू असलेल्या सत्तानाट्याचा काल अखेरचा दिवस होता. नाट्यमय घडामोडीची सांगताही तितक्याच नाट्यमयरित्या झाली. अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारले. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होताच एकनाथ शिंदे रात्रीच गोव्यात पोहोचले. ज्या हॉटेलमध्ये शिंदे गटातील आमदारांना ठेवण्यात आले आहे, त्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे मध्यरात्री दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये पोहोचताच शिंदे गटातील सर्व आमदारांनी पेढा भरवत त्यांचं अभिनंदन केलं. (As soon as the swearing in ceremony took place, Shinde reached Goa and received a warm welcome from the rebel MLAs)

हेही वाचा – एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस नवे उपमुख्यमंत्री

दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटातील नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी एकनाथ शिंदेही उपस्थित होते.


गुवाहाटीवरून गोव्यात गेलेले एकनाथ शिंदे गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. वरळीमार्गे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय सागर बंगला गाठला. तिथे जाऊन त्यांनी मंत्रिपदाबाबत चर्चा केली. या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अटकळ साऱ्यांनी बांधली होती. मात्र, ऐनवेळेला मास्टरस्ट्रोक झाला आणि एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यात आलं. यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात नसतील आणि मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळेला पुन्हा हालचाली बदलल्या आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली.


विधान परिषदेच्या निवडणुकांचा निकाल २० जून रोजी लागल्यानंतर एकामागून एक नाट्यमय घडामोडी रंगत होत्या. २० जूनच्या मध्यरात्रीच एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन सुरतला गेले. तिथून ते गुवाहाटाली पोहोचले. गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर शिंदे गटात अनेक आमदारांनी एन्ट्री घेतली. त्यामुळे शिंदे गटाचा जोर वाढला. दरम्यान, २९ जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा हालचालींना वेग आला. दरम्यान, काल गुरुवारी एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


परंपरा मोडली

नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला मावळते मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याची परंपरा आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने उद्विग्न होत उद्धव ठाकरेंनी आपले पद सोडले होते. त्यामुळे ते नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला गेले नाहीत. तसेच, शिवेसनेचेही नेते गैरहजर होते. दरम्यान, शिंदे गटातील आमदार गोव्यात होते त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.