घरताज्या घडामोडीसर्वोच्च न्यायालयाकडूनच १२ आमदारांवरील अन्याय दूर होईल, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आशिष शेलारांची...

सर्वोच्च न्यायालयाकडूनच १२ आमदारांवरील अन्याय दूर होईल, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Subscribe

न्यायालयाने आमदारांच्या याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर मात्र आमदार आशिष शेलार यांनी समाधानी असल्याचे सांगितले आहे. 

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना सभागृहात गोंधळ घातल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे. या आमदारांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकार आणि वकिलांच्या बाजूने युक्तिवाद संपला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर आणि प्रश्नांवर निलंबित भाजप आमदार आशिष शेलार यांनी समाधानी असल्याचे सांगितले आहे. तसेच न्यायालयाकडूनच आता १२ आमदारांवर झालेला अन्याय दूर होईल असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आशिष शेलार म्हणाले आहेत की, सर्वोच्च न्यायालयासमोर १२ आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर वादविवाद आणि युक्तिवाद संपवला आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने कालपासून या सर्व विषयावर स्वतःचा महाराष्ट्र सरकारचा युक्तिवाद केला. त्यावर आज निलंबित १२ आमदारांच्यावतीने युक्तिवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न, वाद विवादादरम्यान निर्माण केलेले विषय आणि प्रश्नांवर आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडूनच आम्हा १२ आमदारांवर झालेला अन्याय दूर होईल. जनतेसमोर सत्य येईल आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाई विरोधातील निर्णयावर आम्ही समाधानी असू असे आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

न्यायालयाने आमदारांच्या निलंबनावर निर्णय राखून ठेवला

भाजपच्या १२ आमदारांना महाविकास आघाडी सरकारकडून १ वर्षाची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभेत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी कारवाई केली आहे. सभागृहात गदारोळ आणि अध्यक्षांच्या दालनात गैरवर्तन केल्यामुळे निलंबनाची कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर पक्षकारांना लेखी युक्तिवाद करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने आमदारांच्या निलंबनावरुन पुन्हा टीकास्त्रही डागले आहे. न्यायालयाने आमदारांच्या याचिकेवर आपला निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या निर्णयावर मात्र आमदार आशिष शेलार यांनी समाधानी असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्री पद असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेला हे दुर्दैवी, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -