घरअर्थजगतCabinet Decision: SBI ला मिळणार 1000 कोटी रुपये, IREDA मध्ये 1500 कोटी...

Cabinet Decision: SBI ला मिळणार 1000 कोटी रुपये, IREDA मध्ये 1500 कोटी रुपये गुंतवण्यास मान्यता

Subscribe

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने अक्षय ऊर्जेवर खूप लक्ष केंद्रित केलेय. आम्ही 500 ​​GW पूर्ण केले. नवीकरणीय ऊर्जेची वीजनिर्मिती क्षमता वाढवण्यासोबतच, सरकारने आपली वित्त क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या क्षेत्राचा 8,800 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ 6 वर्षांत 28,000 कोटी रुपयांवर पोहोचला. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राची कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी सरकारने त्याला भांडवल देण्यास मान्यता दिली.

नवी दिल्ली : Cabinet Decision: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाने अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन लिमिटेड (IREDA) ला 1500 कोटी रुपयांच्या भांडवलाला मंजुरी दिली. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) व्याजावरील व्याजाच्या बदल्यात 1,000 कोटी रुपये देण्याची परवानगी दिली. राष्ट्रीय सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगाचा कार्यकाळ मंत्रिमंडळाने 3 वर्षांसाठी वाढवला आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाने विशिष्ट कर्ज खात्यांमध्ये कर्जदारांना सहा महिन्यांसाठी चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाची सानुग्रह अनुदान योजना मंजूर केली. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) व्याजावरील व्याजाच्या बदल्यात 1,000 कोटी रुपये देण्याची परवानगी दिली.

- Advertisement -

भांडवल ओतण्याचा फायदा होणार

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने अक्षय ऊर्जेवर खूप लक्ष केंद्रित केलेय. आम्ही 500 ​​GW पूर्ण केले. नवीकरणीय ऊर्जेची वीजनिर्मिती क्षमता वाढवण्यासोबतच, सरकारने आपली वित्त क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या क्षेत्राचा 8,800 कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ 6 वर्षांत 28,000 कोटी रुपयांवर पोहोचला. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राची कर्ज देण्याची क्षमता वाढवण्यासाठी सरकारने त्याला भांडवल देण्यास मान्यता दिली. आता हे क्षेत्र 12,000 कोटी रुपयांपर्यंत कर्ज देऊ शकणार आहे. यामुळे क्षमता 3500 मेगावॅटपर्यंत वाढवण्यासाठी वित्तपुरवठा उपलब्ध होणार आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील भांडवल ओतण्यामुळे दरवर्षी 10,200 रोजगार निर्माण होतील आणि CO2 उत्सर्जन दरवर्षी सुमारे 7.49 दशलक्ष टन कमी होईल.

व्याजावर किती व्याज दिले होते?

कोरोनाच्या काळात सरकारने कर्जावरील स्थगिती 6 महिन्यांसाठी लागू केली होती. या अंतर्गत मार्च 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंत कर्ज न भरल्यास कोणत्याही प्रकारचा दंड किंवा NPA करण्यास मनाई करण्यात आली होती. यानंतर चक्रवाढ व्याजाचा प्रश्न निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयाने बँकांना व्याजावर व्याज आकारता येणार नाही, असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सरकारनेही मान्य केला असून, व्याजाची रक्कम सरकार भरणार असल्याचे सरकारने सांगितले होते. यासाठी सरकारने 5500 कोटी रुपयांची तरतूद केली होती, ज्यामध्ये सरकार व्याज न घेण्याच्या बदल्यात ही रक्कम बँकांना देईल, असे सांगण्यात आले होते.

- Advertisement -

हेही वाचाः एका झूम कॉलवर 900 जणांना नोकरीवरून काढणारे विशाल गर्ग पुन्हा सेवेत परतले

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -