घरCORONA UPDATECorona Update: डॅशिंग अधिकारी अश्विनी भिडेंवर कोरोना वॉर रुमची जबाबदारी

Corona Update: डॅशिंग अधिकारी अश्विनी भिडेंवर कोरोना वॉर रुमची जबाबदारी

Subscribe

मेट्रो रेल्वेवरून वादग्रस्त ठरलेल्या अश्विनी भिडे आणि डॉक्टर रामस्वामी एन. यांची ‘कोविड करोना १९’च्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे. भिडे यांच्यावर महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘करोना‌ वॉर रुम’च्या प्रमुख समन्वयकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या वॉर रुमच्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस सातत्याने करण्यात येणार आहे.

‘करोना कोविड १९’ च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात सोमवारी पार पडली. या बैठकीला अतिरिक्त महापालिका आयुक्त, उपायुक्त, महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, कार्यकारी आरोग्य अधिकारी, संचालक, सहाय्यक आयुक्त, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अधिकारी, प्रमुख अग्निशमन अधिकारी आदी वरिष्ठ पदांवरील अधिकारी हे प्रत्यक्षपणे व ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे उपस्थित होते.

- Advertisement -

आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामध्ये ‘करोना‌ वाॅर रुम’ सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत प्रतिनियुक्तीवर रुजू झालेल्या अश्विनी भिडे या ‘वॉर रुम’च्या प्रमुख समन्वयक आहेत. या ‘वॉर रुम’च्या माध्यमातून आवश्यक ती नियोजनात्मक, प्रतिबंधात्मक व व्यवस्थापकीय कार्यवाही दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस सातत्याने असेल.

या वॉर रुमच्या माध्यमातून कोरोना विषयक सांख्यिकीय माहिती एकत्र करून या माहितीचे सातत्याने विश्लेषण करण्यात येईल. या माहितीच्या व विश्लेषणाच्या आधारे प्रतिबंधात्मक कार्यवाहीची व नियोजनाची पुढील दिशा निश्चित केली जाईल. यानुसार विभागस्तरीय (वॉर्ड लेव्हल) नियोजन व प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही देखील सातत्याने करण्यात येईल,असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -