घरCORONA UPDATE...अन्यथा भारतातील गावं बनतील कोरोनो केंद्र

…अन्यथा भारतातील गावं बनतील कोरोनो केंद्र

Subscribe

भारतात आतापर्यंत ११९० लोकांना कोरोनोची लागण झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आपल्या गावाकडे जात आहेत. पण हे नागरिकच कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास कारणीभूत ठरू शकतात. यामुळे सरकारने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा येत्या काही दिवसात भारतातील गावं कोरोना व्हायरसची केंद्र बनतील असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी नुकतीच एका न्यूजवेबसाईटला मुलाखत दिली. यावेळी सध्याच्या परिस्थितीत भारतात सर्वात मोठी समस्या ही सोशल डिस्टन्सिंगची असल्याचे सांगितले. एकाच घरात अनेकजण दाटीवाटीने राहतात. एकच शौचालय वापरतात. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका अधिक वाढतो. यामुळे वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच घराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे. पण भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशात हे अशक्य झाले आहे. लोकं कुठेही थुंकतात हे त्यांनी टाळले पाहीजे.असे स्वामीनाथन यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

पण त्याचबरोबर लॉकडाऊनमुळे गावाकडे जाणारी नागरिकांची गर्दी ही चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हीच गर्दी कोरोनाची वाहक ठरू शकते. जर गावात कोरोनाचा संसर्ग पसरला तर त्यावर नियंत्रण मिळवणे, जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारपुढचे मोठे आव्हान असणार आहे. कारण हा व्हायरस कोणताही प्रांत, राज्य, धर्म, जात, भेद , राषट्रीयता ओळखत नाही. तो फक्त एकाच्या माध्यमातून दुसऱ्याकडे पसरत जातो. यामुळे हा व्हायरस स्थलांतरीत नागरिकांच्या माध्यमातून गावागावात पोहचला तर भारतातील गावं ही कोरोनाची प्रमुख केंद्र बनतील अशी भीती डॉक्टर स्वामीनाथन यांनी या मुलाखतीत व्यक्त केली आहे. आजच्या स्थितीत भारतासह युरोप व अन्य देशांनी कोरोनो व्हायरसपुढे गुडघे टेकवले आहेत.

यामुळे यावर तीन पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, आणि लॉंग टर्म. यासाठी सुरुवातीला लाॉकडाऊन करणे , सोशल डिस्टेंन्सिंग, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करणे, समाऱंभात जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कोण शहरातून आले आहे व किती जणांच्या संपर्कात आहे हे कळणार आहे. यामुळे नागरिकांनी कोरोनाचा धोका ओळखून जबाबदारीने वागणे हे एकमेव करोनाला नष्ट करण्याचे साधन असल्याचेही स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -