घरमहाराष्ट्रसरकारी वकिलाच्या भावाला ठार मारण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

सरकारी वकिलाच्या भावाला ठार मारण्याचा प्रयत्न; घटना सीसीटीव्हीत कैद

Subscribe

शिवाजी नगर कोर्टातील सरकारी वकील यांच्या भावाला ठार मारण्याचा प्रयत्न दापोडी येथे झाला असून याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगर कोर्टातील सरकारी वकील यांच्या भावाला ठार मारण्याचा प्रयत्न दापोडी येथे झाला असून याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चालक विलास बबन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. आळंदीवरून औंधच्या दिशेने जात असताना त्यांच्या मोटारीला दुचाकीने कट मारला त्यानंतर अज्ञात दोघांनी त्यांच्या गाडीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावरील दगडं मारली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपी अद्याप मोकाट आहेत. अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

मोटारीला कट मारून दगडफेक केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक विलास बबन शिंदे (वय २५) आणि गाडीमालक शहाजान खान हे आळंदीवरून औंधच्या दिशेने त्यांच्या मोटारीने जात होते. तेव्हा, दापोडी येथे वळणावर दुचाकी वरील अज्ञात दोघांनी कट मारला आणि मोटारीला धडक देऊन ते खाली पडले. याचाच राग मनात धरून अज्ञात आरोपींनी गाडीमधील फिर्यादी यांना जाब विचारला हाताने गाडीच्या काचा फोडल्या. मोटारीला दोन दुचाकी ही आडव्या लावून पुढे जाण्यास विरोध केला. हे प्रकरण १२ ते १५ मिनिटे भर रस्त्यावर सुरू होत. मोटार बाजूला घेऊन अज्ञात दोघांनी आणि मोटारीत चालक, गाडी मालक खान यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर चिडलेल्या दोघांपैकी एकाने त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने मोटारीवर दगडं मारली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान, गाडीमालक खान हे शिवाजी नगर कोर्टामधील सरकारी वकील यांचे भाऊ असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत असून आरोपी हे मोकाट आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

आता काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येईल असं वाटत नाही – शिवेंद्रराजे भोसले

आता धनगर समाजाला मिळणार आदिवासींच्या सवलती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -