घरदेश-विदेशहलका ताप, व्हायरल ब्राँकायटिससाठी अँटिबायोटिक औषधं देणं टाळा; ICMR चा डॉक्टरांना सूचना

हलका ताप, व्हायरल ब्राँकायटिससाठी अँटिबायोटिक औषधं देणं टाळा; ICMR चा डॉक्टरांना सूचना

Subscribe

रुग्णांना हलका ताप आणि व्हायरल ब्राँकायटिस यासारख्या आजारांवरह अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात आयसीएमआरने ( ICMR) शनिवारी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार, आरोग्य संशोधन एजन्सीने डॉक्टरांना अँटिबायोटिक औषध लिहून देताना काही नव्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

आयसीएमआरने या गाईडलाईन्समध्ये सांगितले की, जोपर्यंत गंभीर आजारासारखी परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत अँटिबायोटिक्स टाळण्याचा प्रयत्न करा. यात अँटिबायोटिक औषधांचा वापर कुठे करावा आणि कुठे नाही हे सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. तसेच डॉक्टरांना कोणत्या आधारावर अँटिबायोटिक औषधांचा वापर करावा हे देखील सांगितले आहे.

- Advertisement -

ICMR च्या नवीन गाईडलाईन्सनुसार, त्वचा आणि टिश्यू इन्फेक्शनसाठी आणि व्हायरल न्यूमोनियासाठी अँटिबायोटिक औषधांचा वापर पाच दिवस करावा, तर न्यूमोनियाची लागण झालेल्या रुग्णाला अँटिबायोटिक औषधांचा डोस आठ दिवसांसाठी द्यावा.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान केलेल्या ICMR ने केलेल्या सर्व्हेक्षणात दिसून आले की, भारतातील मोठ्या प्रमाणातील रुग्णांवर कार्बापेनेम्स अँटिबायोटिकचा परिणाम दिसत नाही. कारण कार्बापेनेम्स अँटिबायोटिक प्रामुख्याने न्यूमोनिया आणि सेप्टिसीमिया इत्यादींच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध आहे. मात्र न्यूमोनियाच्या रुग्णांवर या औषधाचा वापर सरसकट होतो. पण बहुतेक रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरत नसल्याने आयसीएमआरने रुग्णाच्या स्थितीवर आधारित अँटिबायोटिक औषधाचा डोस रुग्णाला द्यावा की नाही हे ठरवावं, अशा सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.

- Advertisement -

सामान्यत: सेप्सिस आणि सेप्टिक शॉक, व्हायरल न्यूमोनिया, व्हेंटिलेटर-संबंधित न्यूमोनिया आणि नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिसने ग्रस्त रुग्णांवर अँटिबायोटिक औषधांचा वापर केला जातो. यात डॉक्टरांनी रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल अशा औषधांचा डोस तयार करण्याचा प्रयत्न करावा.


मुंबई विमानतळावर DRIची कारवाई; 50 कोटींच्या ड्रग्जसह 2 जणांना अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -