घरठाणेअंबरनाथचा कचरा बदलापूरला नकोच, सर्वपक्षीय एकवटल्यानंतर पालिकेकडून पूर्णविराम

अंबरनाथचा कचरा बदलापूरला नकोच, सर्वपक्षीय एकवटल्यानंतर पालिकेकडून पूर्णविराम

Subscribe

बदलापूर शहरात मागील काही दिवसांपासून कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. अंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये नको अशी भूमिका घेत बदलापूरमधील विरोधी पक्षांनी आंदोलन केली आहेत. तर आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना घेराव घातला होता. हा प्रश्न आपण शासन दरबारी मांडावा आणि बदलापूर शहरात अंबरनाथचा कचरा आणू नये, अशी मागणी यावेळी महाविकास आघाडीने केली. दरम्यान यावर उत्तर देताना पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी अंबरनाथचा कचरा बदलापूरमध्ये येणार नाही, अशी भूमिका घेत कचरा प्रश्नाला पूर्णविराम दिला. तर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी तात्पुरत्या स्वरूपातला कचरा बदलापूर शहरात टाकू देणार नाही अशी भूमिका घेतली, याबाबत खासदारांशी बोलणं झाले असल्याचेही वामन म्हात्रे म्हणाले.

कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या स्वप्नातील कचरा प्रकल्पाला बदलापूरकरांनी विरोध केला आहे. बदलापूरच्या वालीवली परिसरातील डम्पिंग ग्राउंड वर, कल्याण लोकसभेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून अद्ययावत कचरा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. स्पेनच्या धर्तीवर हा प्रकल्प तयार केला जाणार आहे. या प्रकल्पात अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.

- Advertisement -

मात्र या प्रकल्पाला दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने आंदोलन करत विरोध केला. त्यानंतर आज महाविकास आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना घेराव घातला होता. यावेळी कचऱ्याचा प्रश्न आपण शासन दरबारी मांडावा आणि बदलापूर शहरात अंबरनाथचा कचरा आणू नये, अशी मागणी यावेळी महाविकास आघाडी आणि मनसेने केली.

आम्ही जन भावनेसोबत आहोत – खासदार कपिल पाटील

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं केलेल्या आंदोलनात आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या विरोधात रोष व्यक्त केला होता. याबाबत खासदार कपिल पाटील यांना विचारलं असता आम्ही जन भावनेसोबत आहोत असं म्हणत अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाला विरोध केलाय. मात्र प्रत्यक्षपणे विरोध करण्याचं खासदार कपिल पाटील यांनी टाळलं.

चांगला प्रकल्प असावा असं खासदारांचं स्वप्न – वामन म्हात्रे

दरम्यान याबाबत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांना विचारला असता, हा प्रकल्प बदलापूर शहरासाठी महत्त्वाचा आहे. मात्र ज्या पक्षांनी शहरात दहा रुपयाची विकास कामे केली नाहीत त्यांनी आंदोलन केलंय. तर महाविकास आघाडीला आव्हान करत खासदार श्रीकांत शिंदे लाचारीचं काम करत नाहीत, खासदार पदावर असताना मतदारसंघात आणि आजूबाजूच्या शहरात चांगला प्रकल्प असावा असं खासदारांचं स्वप्न आहे, म्हणून त्यांनी हा प्रकल्प मंजूर केला असल्याचं वामन म्हात्रे म्हणाले.

अंबरनाथ पालिकेनं बदलापूरच्या वालीवली इथं कचरा टाकण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. याबाबतचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी अंबरनाथ पालिकेला आठ मार्चला पाठवलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि मनसेनं ड्रीम प्रोजेक्टला विरोध करत, अंबरनाथ पालिकेनं तात्पुरत्या स्वरूपात सुद्धा बदलापूरमध्ये कचरा टाकू नये अशी भूमिका घेत तीव्र निषेध केला. याबाबत त्यांनी बदलापूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची देखील भेट घेतली. यावेळी अंबरनाथ पालिकेला बदलापूर शहरात कचरा टाकण्यासाठी परवानगी दिली नाही. तसंच जिल्हाधिकाऱ्यांकडून बदलापूर पालिकेला कोणतंही पत्र किंवा आदेश प्राप्त झाले नाहीत, असं सांगत कचरा प्रश्नाला पूर्णविराम दिलाय.

दरम्यान बदलापूर शहरात होणाऱ्या प्रकल्पाला अजून दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्याआधी अंबरनाथ पालिकेची कचराकोंडी झाल्यानं.अंबरनाथ पालिकेला बदलापूर शहरात कचरा टाकायला परवानगी मिळेल का? हे पाहावं लागणार आहे.


हेही वाचा : दिलासा! मार्चमधील अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -