घरताज्या घडामोडीमनसे ठाम ! ठरलेल्या ठिकाणी अन् वेळीच राज ठाकरेंची सभा, पोलीस आयुक्त...

मनसे ठाम ! ठरलेल्या ठिकाणी अन् वेळीच राज ठाकरेंची सभा, पोलीस आयुक्त भेटीनंतर बाळा नांदगावकरांचे स्पष्टीकरण

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या १ मे रोजीच्या औरंगाबादच्या सभेला अद्यापही पोलिसांची परवानगी मिळालेली नाहीये. परंतु पोलिसांच्या परवानगीची वाट पाहू नका, तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आधीच दिले आहेत. औरंगाबाद येथील या सभेसाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे. सदरील सभा मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर होणार आहे. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी औरंगाबाद येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची भेट  घेतली. राज ठाकरेंची सभा ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळीच होणार, असं स्पष्टीकरण बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे.

बाळा नांदगावकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, देशामध्ये सर्वांनी हनुमान चालिसा म्हणावं, याची संपुर्ण तयारी करून मी आलो आहे. पोलीस आयुक्तांची आम्ही भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची व्हिसी सुरू आहे. तसेच आम्ही मैदानाची पाहणी करणार आहोत.

- Advertisement -

हे एक ऐतिहासिक मैदान

सभा घेण्यासाठी मैदान बदललं जावं, असं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर नांदगावकर म्हणाले की, हे एक ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानावर सन्माननीय बाळासाहेब, इंदिरा गांधी आणि राज ठाकरेंची सभा झालेली आहे. त्यामुळे या मैदानाचं महत्त्व वेगळं आहे. या ठिकाणी सभा व्हावी असा आमचा आग्रह आहे. त्यांना आमचे संपूर्ण सहकार्य असणार आहे. त्यामुळे या मैदानावर सभा घेण्यास परवागनी दिली, तर आम्हाला सोयीस्कर होईल, अशी विनंती पोलीस आयुक्तांना केल्याची माहिती नांदगावकरांनी दिली.

ठरलेल्या ठिकाणी अन् वेळीच राज ठाकरेंची सभा

राज ठाकरेंची सभा ठरलेल्या ठिकाणी, ठरलेल्या वेळीच होणार, असं स्पष्टीकरण बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे तसेच पोलिसांना आमचं पूर्णपणे सहकार्य असल्याचं देखील नांदगावकर म्हणाले. त्यामुळे आता मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र दिसत आहे.

- Advertisement -

मनसेकडून सभेची तयारी, निमंत्रण, होर्डिंग, रॅली आणि झेंडे लावण्याचे काम जोरात सुरू आहे. आता मुंबईहून देखील औरंगाबाद शहरात नेते दाखल होत असल्याने मनसैनिकांच्या उत्साहाला अधिकच उधाण येणार आहे.


हेही वाचा : सोमय्यांनी आपल्याला झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल राज्यपालांना सादर करावा – महेश तपासे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -