घरमहाराष्ट्रपटोलेंना मुंगेरीलालची सुखद स्वप्ने पडताहेत- बावनकुळे

पटोलेंना मुंगेरीलालची सुखद स्वप्ने पडताहेत- बावनकुळे

Subscribe

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज दि.७ रविवारी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. या वचननाम्यात शाश्वत विकासाची ग्वाही त्यांनी दिली आहे. नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना विजयाची सुखद स्वप्ने पडता आहेत. तर २३ मे रोजी त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ मालिकेतील पात्राप्रमाणे नागपुरातील काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांना विजयाची सुखद स्वप्ने पडता आहेत. परंतु, २३ मे रोजी त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आज दि.७ रविवारी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बावनकुळे यांनी बोलवली होते.

जाहिरानामा प्रकाशित

नागपूर मतदारसंघाच्या पायाभूत विकासाला केंद्रस्थानी ठेऊन बनवलेल्या या जाहीरनाम्यानुसार आयआयएम, ट्रीपल आयटी, नॅशलन लॉ स्कूलसारख्या संस्थांच्या माध्यमातून नागपुरातील वर्धा मार्ग हा ज्ञानसंमृद्धी मार्ग म्हणून विकसीत करणार आहोत. मिहानमध्ये दरवर्षी २५ हजार रोजगारांची निर्मीती केली जाईल, आगामी ५ वर्षात ५० हजार रोजगारांची निर्मिती करणार, मिहानमध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरची उभारणी आणि डिफेन्स मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग हब तयार करणार त्यासोबतच तेलंखडी उद्यानाच्या जागेवर ऍग्रो कन्व्हेंवेंशन सेंटर उभारणार, नागपूर रेल्वेच्या विस्तारासह कामठी, गोधनी आणि खापरी स्थानकांचे विस्तारिकरण करणार, नागपूर रेल्वे स्थानकासमोर आठ लेन रस्ता तयार करणार, नागपुरातील अजनी स्थानकाचे आधुनिकीकरण करणार त्यासोबतच नागपूर-काटोल, नागपूर-वर्धा, नागपूर-भंडारा ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे सुरू करणार, नागपुरातील एम्प्रेस मिलच्या जागेवर रेडिमेन्ट गारमेंट झोन तयार करणार, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारीकरण, अंबाझरी उद्यानाजवळ २५ हजार आसनक्षमतेच्या खुल्या स्टेडियमची उभारणी, फुटाळा तलावावर जागतिक स्तरावरील म्युझिकल फाऊंटन, मतदारसंघात एक लाख घरे बांधणार, शिल्पग्राम, चित्रनगरी उभारणार नागपुरातील सावजी खाद्याचे ब्रँडिंग इत्यादी प्रमुख घोषणांचा समावेश आहे.

- Advertisement -

जाहिरनाम्यात अजून काय?

यासोबतच फ्लाय ऍशपासून विटांची निर्मिती, नागनदीचे सौदर्यीकरण, कचऱ्याचे सेग्रीगेशन, मलःनिस्सारण योजना, वातानुकूलित बाजारपेठ आणि व्यापारी केंद्र, स्वदेशी मॉलला प्रोत्साहन, खेळांसाठी ३५० मैदाने, शहरातून गुन्हेगारी हद्दपार, नव्या पर्यटन स्थळांची उभारणी, पार्किंगची समस्या सोडवणार, फिल्मसीटी पर्यटनाला चालना, ट्रांसपोर्ट झोनची निर्मीती बायोडायव्हर्सिटी पार्कची उभारणी, विणकरांसीठी क्लस्टर, एनएमआरडीएच्या माध्यमातून शहराचा विकास इत्यादी गोष्टींना जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. यासंपूर्ण जाहीरनाम्यात गेल्या ५ वर्षातील विकासाची माहिती आणि आगामी ५ वर्षांचे ब्ल्यू-प्रिंट अधोरेखीत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -