घरमहाराष्ट्रनव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात, 'या' दिवशी विदर्भात सुरू होणार शाळा

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात, ‘या’ दिवशी विदर्भात सुरू होणार शाळा

Subscribe

राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना घरी बसून शिकावे लागले होते. त्यानंतर मध्येच शाळा सुरू, मध्ये बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत होता. आता पुन्हा नवे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. यामुळे शाळा प्रशासनानेदेखील योग्य ती खबरदारी घेतलेली दिसून येत आहे. दोन दिवसांपासून स्वच्छता कोरोना आवश्यक उपाययोजना शाळा प्रशासनातर्फे करण्यात आल्या. त्यानंतर आज विद्यार्थी आपल्या आवडत्या शाळेत रमणार आहेत.

विदर्भात 29 जूनपासून शाळा होणार सुरू –

- Advertisement -

शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशा प्रमाणे 13 आणि 14 जून रोजी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून शाळेची स्वच्छता, सौदर्यीकरण, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले होते. तर 15 जूनपासून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्याव, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार राज्यात विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. मात्र ,विदर्भात शाळा उशिरा सुरू होणार आहेत. येथील शाळा 27 जूनपासून सुरू होणार आहेत. 27,28 जूनला शाळा निर्जंतुक केल्या जाणार आहेत. तर दोन दिवसांनंतर 29 जूनपासून विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाय योजना –

- Advertisement -

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस आणि बुस्टर डोस घेण्याबाबत विभाग स्तरावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. 12 वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. शाळेचा परिसर तसेच वर्गांत कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. कोणतेही कोविडसदृश्य लक्षणे आढळल्यास किंवा, ताप, खोकला असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याच्या सूचना पालकांना करायच्या आहेत. त्याचबरोबर अशा लक्षणाचे विद्यार्थी असल्यास त्वरीत शाळेतच विलगीकरणाची व्यवस्था असावी, त्यांची कोविड टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध असावी, अशा सूचना शाळा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -