घरताज्या घडामोडी'त्या' साखर कारखान्यास मदत करणार, भागवत कराडांचं मोठं वक्तव्य

‘त्या’ साखर कारखान्यास मदत करणार, भागवत कराडांचं मोठं वक्तव्य

Subscribe

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची जीएसटी पथकाकडून चौकशी करण्यात आली. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील भाजपवर निशाणा साधला होता. कारवाईसाठी पंकजा मुंडे यांचा कारखाना कसा भेटला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कारखान्याने आर्थिक व्यवहार करताना जीएसटी थकीत ठेवल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्यासंबंधीची तपासणी सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, वैद्यकीय सहकारी साखर कारखान्यांसारख्या राज्यातल्या ८ ते १० कारखान्यांना केंद्र सरकार मदत करेल, असं मोठं वक्तव्य केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केलं आहे.

भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अशा प्रकारचे ८ ते १० कारखाने राज्यात होते. या कारखान्यांचा विषय घेऊन राज्यातलं एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने आता त्यांना मदत करायचं ठरवलं आहे.

- Advertisement -

आजारी साखर कारखान्यांना मदत करा – पंकजा मुंडे

वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या ६ ते ७ वर्षांपासून नुकसानीत आहे. कसातरी आम्ही तो चालवत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी यासंदर्भात भेट घेतली होती. यावेळी राज्यातल्या ४-५ कारखान्यांचा प्रश्न मांडला होता. आम्हाला जीएसटी भरायचाय, कर्ज थकित आहे, असे काही प्रश्न त्यावेळी होते. या आजारी साखर कारखान्यांना मदत करा, अशी विनंती आम्ही केली होती, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

- Advertisement -

परळी वैद्यनाथ कारखान्यावर जवळपास १६ कोटींचा जीएसटी बुडवण्याचा आरोप आहे. साखर विक्रीतून जो जीएसटी भरणा अपेक्षित होता तो भरला नाही. ज्यांना साखर विक्री केली त्यांच्याकडून जीएसटी घेतला, मात्र तो जीएसटी कार्यालयाला भरला नाही असा आरोप आहे. त्यामुळे केंद्रीय जीएसटी विभागाने कारखान्यावर धाडी टाकल्या.


हेही वाचा : सचिन वाझेला पोलीस सेवेत पुन्हा कोणी घेतले? अनिल देशमुखांचा मोठा खुलासा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -