घरताज्या घडामोडीडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजपाच्या भीमयात्रांनी गजबजली मुंबई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजपाच्या भीमयात्रांनी गजबजली मुंबई

Subscribe

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भाजपातर्फे ३० हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भीमयात्रा आणि जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांनी आज दिवसभर मुंबई गजबजून गेली होती. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज मुंबई भाजपातर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

मुंबई : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई भाजपातर्फे ३० हून अधिक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या भीमयात्रा आणि जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांनी आज दिवसभर मुंबई गजबजून गेली होती. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज मुंबई भाजपातर्फे २२७ वॉर्डमध्ये जयंती उत्सव व विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच ३० ठिकाणी भीमयात्रा काढण्यात आल्या तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रेरणादायी जीवनपट उलघडून दाखविणारा लेजर शो वरळीत १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. (On the occasion of Dr Babasaheb Ambedkar birth anniversary Mumbai was crowded with BJP Bhimyatra)

आज या निमित्ताने मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार संपूर्ण मुंबईचा दौरा करुन जयंती उत्सवात सहभागी झाले. सकाळी चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा आणि आमदार आशिष शेलार यांनी अभिवादन केले. त्यानंतर ॲड. आशिष शेलार दिवसभर मुंबईतील १२ जयंती उत्सवात सहभागी झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या परेल येथील खोली क्र. ५०/५१, बीआईटी चाळ व दादर राजगृह येथे जाऊन अभिवादन केले.

- Advertisement -

हे खासदार व आमदार उपस्थित

गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, पूनम महाजन, सुनील राणे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, अमित साटम, मनिषा चौधरी, राम कदम, योगेश सागर, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, तमिल सेल्वन, भारती लव्हेकर, मिहीर कोटेचा, भाई गिरकर, पराग शाह, आदीसह भाजपाचे पदाधिकारी आपापल्या मतदारसंघातील जयंती उत्सवात सहभागी झाले होते.

- Advertisement -

याशिवाय, लोखंडवाला कांदिवली पूर्व,‍ दिंडोशी आरे कॉलनी, वर्सोवा जीवन नगर, कुर्ला नेहरु नगर, महाराणा प्रताप चौक माझगाव, कुलाबा, नायगाव, पंचशिल नगर २ सायन कोळीवाडा, चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते लाल डोंगर ते वाशी नाका तसेच गोवंडी स्टेशन, विक्रोळी, संविधान चौक मानखुर्द शिवाजी नगर, घाटकोपर पश्चिम, रमाबाई नगर घाटकोपर पूर्वसह भांडूप, मुलुंडसह एकुण ३० ठिकाणी जयंती निमित्त भीमयात्रांचे आयोजन करण्यात आले. काही यात्रा सकाळी तर काही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरु होत्या.


हेही वाचा – सचिन वाझेला पोलीस सेवेत पुन्हा कोणी घेतले? अनिल देशमुखांचा मोठा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -