घरमहाराष्ट्रभारत भालके यांना निवडून आणणार - अजित पवार

भारत भालके यांना निवडून आणणार – अजित पवार

Subscribe

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.

मागील काही दिवसांपासून काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आज अखेर भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात भारत भालके आणि सुधाकर पंत परिचारक अशी निवडणूक रंगण्याची शक्यता आहे. यावेळी उपस्थित अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही तयार आहोत.”

हेही वाचा – मी निवडणूक लढवणार; आदित्य ठाकरेंचा एल्गार!

काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास नकार

२०१४ ची विधानसभा निवडणूक भारत भालके हे काँग्रेसच्या तिकीटावर लढले होते. पण यंदा मात्र त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे भारत भालके भाजप किंवा शिवसेनेकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा रंगली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -