घरमहाराष्ट्रमहाडमध्ये भरत गोगावालेंची विजयी हॅट्ट्रिक

महाडमध्ये भरत गोगावालेंची विजयी हॅट्ट्रिक

Subscribe

महाड विधानसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या भरत गोगावले यांनी बाजी मारली आहे. सलग तीनवेळा निवडून येत गोगावले यांनी मतदारसंघात भगवा फडकवला आहे. शिवसेनेच्या या विजयाने मतदारसंघात जल्लोष साजरा केला जात असला तरी ‘अब की बार पस्तीस हजार पार’ हा गोगावालेंचा संकल्प रोखण्यात काँग्रेसचे माणिक जगताप मात्र यशस्वी झाले आहेत.

गोगावले २१ हजार २५६ मतांनी विजयी झाले. सुरूवातीच्या पहिल्या फेरीत अवघ्या १४ मतांची आघाडी गोगावले यांनी घेतली. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पुढील फेर्‍यांमध्ये त्यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला. प्रथम पोस्टल मतदानाची मोजणी घेण्यात आली. त्यानंतर माणगाव, निजामपूर आणि त्यानंतर महाड, पोलादपूरमधील ईव्हीएम यंत्रांची मतमोजणी घेतल्यानंतर निजामपूर-माणगाव विभागातून गोगावले यांनी सुमारे ५ हजारांची आघाडी मिळाली. महाड शहरातदेखील शिवसेनेला ४०० ची आघाडी मिळाली. त्यानंतर पोलादपूर आणि बिरवाडी विभागातील आघाडी काँग्रेसला तोडता आली नाही.

- Advertisement -

२००९ मध्ये गोगावले १४ हजार ५०, तर २०१४ मध्ये २१ हजार २५८ मतांनी विजयी झाले होते. यावेळी त्यांना १ लाख १ हजार ३७२ मते मिळाली. जगताप यांना सन २००९ मध्ये ७१ हजार ६००, २०१४ मध्ये ७३ हजार १५२ आणि या निवडणुकीत ८० हजार ११४ मते मिळाली आहेत. यामुळे जगताप यांनी आपला काँग्रेसचा मतदार ठाम ठेवला आहे. मनसेने यावेळीदेखील मतदार आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेचे देवेंद्र गायकवाड यांना २२२५ मते मिळाली. यावेळी अपक्ष उमेदवारांना मात्र डिपॉझिटही शाबूत ठेवता आले नाही.

निकाल जाहीर होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत गोगावले यांची विजयी मिरवणूक काढली. निवडणुकीमधील हा विजय आपण सर्वसामान्य जनतेला समर्पित करीत आहे. सामान्य जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाल्यानेच आपल्याला एक लाखांपेक्षा जास्त मतदानाचा टप्पा पार करता आला, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली.

- Advertisement -

भरत गोगावले (शिवसेना) 101372
माणिक जगताप (काँग्रेस) 80114
देवेंद गायकवाड (मनसे) 2225

विजयी उमेदवार – भरत गोगावले (शिवसेना)
मिळालेली मते – 1,01,372
पराभूत उमेदवार – माणिक जगताप (काँग्रेस)
मिळालेली मते – 80,114

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -