घरमहाराष्ट्रभीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे पोलीस अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेणार

भीमा कोरेगाव हिंसाचार : पुणे पोलीस अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेणार

Subscribe

हार्ड डिस्कमधील डिलीट झालेला डाटा मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेची तपास संस्था एफबीआयची मदत घेणार आहेत.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पुणे पोलीस आता अमेरिकेच्या तपास संस्थेची मदत घेणार आहेत. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या वरावर राव यांच्या घरातून हार्ड डिस्क जप्त करण्यात आली होती. त्यामुळे या हार्ड डिस्कमधील डिलीट झालेला डाटा मिळविण्यासाठी ते अमेरिकेची तपास संस्था एफबीआयची मदत घेणार आहेत. यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक अमेरिकेला जाणार आहे.

मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी

दरम्यान कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन समारंभ पार पडणार आहे. १ जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार उफाळला होता. याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान यंदाचा कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंसह १६३ जणांना पुणे जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

पुणे पोलिस अधिकारांचा गैरवापर करतंय

दरम्यान भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर पार पडलेल्या एल्गार परिषदेतील साहित्यिकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे पोलिसांनी अधिकारांचा गैरवापर करत अनेक साहित्यिकांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले आहेत, असा आरोप करत चुकीचे गुन्हे दाखल करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून तपास काढून घेण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे.

हेही वाचा – दिल्लीतलं शेंबडं पोरगं काहीतरी वक्तव्य करत राहातं – शरद पोंक्षे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -