घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशुभांगी पाटील संगमनेरमध्ये, थोरातांना भेटण्याचे स्वप्न; मात्र बंगल्याचे दार उघडलेच नाही

शुभांगी पाटील संगमनेरमध्ये, थोरातांना भेटण्याचे स्वप्न; मात्र बंगल्याचे दार उघडलेच नाही

Subscribe

संगमनेर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील शुक्रवारी (दि.२०) संगमनेरमध्ये आल्या असता त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी भेट दिली. मात्र, घरी कुणीच नसल्याने त्यांचा हिरमोड झाला.

नाशिक पदवीधर मतदारसंघात स्थानिक युवा नेते सत्यजीत तांबे व आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात लढत रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर पाटील या शुक्रवारी आल्या होत्या. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. थोरात यांच्या सुदर्शन या निवासस्थानी त्या गेल्या. मात्र, आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी या घरी नसल्याने त्यांच्या बंगल्यावर कुणीच नव्हते. वाँचमनने गेट न उघडताच त्यांना हे सांगितल्यावर त्या पत्रकारांशी बोलून तेथून निघाल्या.
ज्येष्ठ नेते आमदार थोरात यांच्याशी फोनवर बोलणे झाले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, शुभांगी पाटील यांच्यासाठी थोरात यांच्या बंगल्याचे गेट न उघडल्याने चर्चेला मात्र उधाण आले आहे. आगामी काळात आमदार थोरात नेमका कुणाचा प्रचार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -
मुद्दाम दार बंद ?

शुभांगी पाटील यांचा थेट सामना सत्यजित तांबे यांच्या सोबत आहे. खरतर सत्यजित यांचे बंड झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्या विरोधकांनी आणि स्वकीयांनीही त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत या बंडाबाबत थोरातांची काय भूमिका आहे अशी विचारणा केली होती. त्यात अद्यापही थोरात यांनी या सर्व राजकीय घडामोडी बाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे त्यांच्या भूमिके बद्दल आजही संभ्रम कायम आहे. अश्यातच, शुभांगी पाटील यांनी थोरतांना भेटण्यासाठी थेट त्यांचं घर गाठल. त्यांनी थोरात आहेत की नाही याची पूर्व कल्पना घेऊनच त्या तिथरे गेल्या असतील. मात्र, त्यांच्यासाठी बंगल्याचे दार न उघडल्याने, खरच थोरात घरात नव्हते की मुद्दामच दार बंदच ठेवण्यात आले, अश्या चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -