घरमहाराष्ट्रनागपूरPM किसान-Namo किसान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी धनजंय मुंडेंचे मोठे आश्वासन, म्हणाले...

PM किसान-Namo किसान योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी धनजंय मुंडेंचे मोठे आश्वासन, म्हणाले…

Subscribe

नागपूर : केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज (ता. 14 डिसेंबर) कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजना आणि नमो किसान महासन्मान योजनेबाबत आमदार नाना पटोले, आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रश्नोत्तराच्या तासामध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी त्याला उत्तर देताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. (Big promise of Dhananjay Munde for deprived farmers of PM Kisan-Namo Kisan Yojana)

हेही वाचा – Winter Session : ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार, मंत्री धनंजय मुंडेंची माहिती

- Advertisement -

पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्यसरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधारशी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यांपैकी 12 ते 13 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.

तर, पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांवरील अटींची पूर्तता करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही, अशी खात्रीही धनंजय मुंडे यांनी उपस्थित प्रश्नाच्या निमित्ताने दिली.

- Advertisement -

आज सभागृहात धनंजय मुंडे यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेबाबतही महत्त्वाची माहिती दिली. शेततळे मंजुरी कृषी विभाग करत असला, तरी राबविण्याची जबाबदारी रोजगार हमी विभाग पार पाडतो, त्यामुळे दोन्ही विभागांचा समन्वय साधून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी दोन्ही विभागांच्या समन्वयातून अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असेही धनंजय मुंडे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आज विधानसभेत मंत्री मुंडे यांनी मागेल त्याला शेततळे संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -