Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'भाजपकडून सत्तेचा गैरवापर', शरद पवारांची टीका

‘भाजपकडून सत्तेचा गैरवापर’, शरद पवारांची टीका

Subscribe

पुणे : भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या बैठकीनंतर अजित पवारांच्या माध्यमातून भाजपने शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

शरद पवार म्हणाले, “देशातील लोकशाही ही नेत्यांमुळे टीकली नाही, तर सामान्य माणसामुळे ती टीकली आहे. हा सामान्य माणूस असा आहे की, तो शांत असतो. पण ज्यावेळी त्याला बटन दाबाची संधी मिळते. तेव्हा नेमके कोणते बटन दाबायेच हे सांगायला लागत नाही. 70 टक्के राज्यातील जनतेने कोणती बटन दाबले. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील बदल घडले.”

- Advertisement -

हेही वाचा – जयंत पाटीलही जाणार अजित पवारांसोबत, जलसंपदा खात्यासाठी आग्रही; श्रावणात शपथविधी?

सत्तेचा वापर जनतेच्या भल्यासाठी वापरली जात नाही

“सर्व एक विचारांचे लोक एकत्रित येईला पाहिजे. या लोकांची पार्श्वभूमीही लोकांचे भले करण्याची आहे. यानंतर जो निकाल येईल, तो माझ्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. काही लोक आहेत ते निष्ठावंत आहेत. आपण मिळून काम करू या. सत्ता ही लोकांच्या भेल्यासाठी वापरली जात नाही आणि जनतेमध्ये भेदभाव कसा होईल हे पाहिजे जाते, अशी टीका शरद पवार यांनी भाजपवर केली आहे”, असे शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवारांना भाजपने दिली ‘ही’ ऑफर; माजी मुख्यमंत्री चव्हाणांचा दावा

शरद पवारांना भाजपकडून ऑफर

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “पुण्यातील उद्योगतीच्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीदरम्यान शरद पवारांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील देखील उपस्थित होते”, अशी माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी प्रकाशित केली.

- Advertisment -